सध्या धनश्री ही ऋषिकेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेवर आजही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. या मालिकेतील सर्वच कलाकार आजही प्रसिद्धीझोतात आहेत.
या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान निर्माण केले होते. याच मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून धनश्री काडगावकरला ओळखले जाते.
धनश्री काडगांवकरने आतापर्यंत विविध मालिकांमधून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या धनश्री ही ऋषिकेशमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे.
यात तिने ऋषिकेशमधील सुंदर, शांत आणि नयनरम्य वातावरणाचे फोटो शेअर केले आहेत.
यावेळी तिने सुंदर ड्रेस परिधान करत निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत असल्याचे सांगितले आहे.
"तुमच्यातही निसर्गाची शांतता येऊ द्या, शुभ सकाळ", असे कॅप्शन धनश्रीने इन्स्टाग्रामच्या पोस्टवर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी धनश्री ही 'तू चाल पुढे' या मालिकेत झळकली होती. यात तिने शिल्पी हे पात्र साकारले होते. तिची ही भूमिका ग्रे शेडमधील होती.