'आई कुठे काय करते' मधील अरुंधती पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. या लोकप्रिय मालिकेत दिसणार. पाहा फोटो
काही दिवसांपूर्वीच स्टार प्रवाहवरील प्रसिद्ध मालिका 'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र, ही मालिका अजून प्रेक्षकांच्या मनात आहे.
त्यानंतर आता स्टार प्रवाहवरील 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' ही मालिका सध्या खूपच चर्चेत आहे. अशातच आता या मालिकेत अरुंधतीची एन्ट्री होणार आहे.
'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेतील स्विटी आणि मकरंद यांच्या लग्नाची सध्या जोरदार धामधूम सुरु आहे.
अशातच आता 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अरुंधती म्हणजेच मधुराणी प्रभुलकर आणि निवेदिता सराफ या दोघी एकत्र दिसणार आहेत.
मधुराणी म्हणाली की, अरुंधतीची भूमिका मला पुन्हा साकारायला मिळत असल्याचा मला आनंद आहे. अरुंधतीचे लाखो चाहते आहेत.
आता 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेत ती दिसणार आहे. नव्या टीमसोबत काम करताना खूप छान वाटत असल्याचं देखील तिने सांगितलं.
सध्या 'आई आणि बाबा रिटायर होत आहेत' या मालिकेचा नवीन प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अरुंधतीची एन्ट्री दिसत आहे.