प्राजक्ता माळी सध्या तिच्या फुलवंती चित्रपटामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच ती तिच्या नवीन पोस्टमुळे चर्चेत आलीये.
प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते. सध्या तिच्या लग्नाबद्दलच्या प्रश्नामुळे चर्चेत आली आहे.
नुकतेच प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर एक सेशन होस्ट केला होता. ज्यामध्ये तिने पहिल्यांदाच मोनमोकळ्या पणाने गप्पा मारल्या.
ज्यामध्ये तिने चाहत्यांना तुमचे प्रश्न विचारा असं म्हटले होते. त्यावेळी प्राजक्ता माळीच्या चाहत्याने थेट अभिनेत्रीला लग्नाची मागणी घातली.
तू माझ्यासोबत लग्न करणार का? तुझ्यामुळे मी पण अजून लग्न केलं नाहीये. I Love You. त्यावर अभिनेत्रीने भन्नाट उत्तर दिलं आहे.
प्राजक्ता म्हणाली की, माझं काही खरं नाही तुम्ही करून टाका. (सगळेच जे थांबलेत...जनहित में जारी...) (Spread the word..)
सध्या तिच्या या हटके उत्तराची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
इन्स्टाग्रामवर प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी चाहत्यांसाठी नेहमी वेगवेळ्या लुकमधील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.