PHOTOS

जमलंय..., प्रियदर्शिनी इंदलकरच्या निळ्या कॉटन साडीतील लूकने लावले चाहत्यांना वेड

मराठी अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकरच्या निळ्या रंगाच्या कॉटन साडीमधील फोटोंनी धुमाकूळ घातलाय. 

...
Advertisement
1/7

महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून अभिनेत्री नेहमी प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. अशातच आता ती तिच्या नवीन लुकमुळे चर्चेत आली आहे. 

2/7

अभिनेत्रीने तिचे निळ्या रंगाच्या कॉटन साडीमधील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

3/7

प्रियदर्शिनीने निळ्या रंगाच्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री प्रियदर्शिनी खूपच सुंदर दिसत आहे. 

4/7

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना अभिनेत्रीने Six Yards Of Love...! असं कॅप्शन दिलं आहे. या साडीत अभिनेत्रीने एकापेक्षा एक हटके पोज दिल्या आहेत. 

5/7

या फोटोत अभिनेत्रीने काळ्या रंगाचा गॉगल आणि सिंपल मेकअप केला आहे. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला आहे. 

6/7

तिच्या या फोटोवर एका चाहत्यांने जमलंय अशी कमेंट्स केली आहे. तर दुसऱ्या एका चाहत्याने कडक अशी कमेंट केली आहे. 

7/7

सध्या अभिनेत्री 'विषामृत' या नाटकात काम करत आहे. सोशल मीडियावर तिचे लाखो चाहते आहेत. ती नेहमी चाहत्यांसाठी फोटो शेअर करत असते. 





Read More