PHOTOS

'फ्रँडी'मधील शालूचा बदलला लूक, साडीमधील फोटो पाहून चाहते थक्क, चाहत्यांनी केलं ट्रोल

नागराज मंजुळे यांच्या 'फँड्री' चित्रपटातून प्रसिद्ध झालेली शालू म्हणजेच राजेश्वरी खरात सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आली आहे. 

Advertisement
1/8

'फँड्री' चित्रपटात तिने शालूची भूमिका साकारली होती. तिची ही भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. 

2/8

अशातच आता राजेश्वरी खरातने तिचे साडीमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

3/8

राजेश्वरी खरात ही सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिने नुकतेच साडीमध्ये वेगवेगळ्या पोज देत फोटो पोस्ट केलेत. 

4/8

अभिनेत्री नेहमी तिच्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. काही दिवसांपासून जब्या आणि शालू दोघांची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

 

5/8

राजेश्वरी खरातने सोमनाथसोबतचे हळदीचे आणि लग्नाचे फोटो शेअर केले होते. ती नेहमी दोघांचे फोटो शेअर करत असते. 

6/8

मात्र, तिचे लग्नाचे फोटो पाहून अनेकांना धक्का बसला होता. दोघांनी गुपचूप लग्न केल्याचं देखील म्हटलं जात होतं. 

7/8

चाहत्यांनी तिच्या या फोटोंवर कमेंट करत लग्न जमलं आहे की काय?  की एखाद्या चित्रपटासाठी हे शूटिंग केलं आहे असे प्रश्न विचारले आहेत. 

8/8

मात्र, अभिनेत्रीने एका मुलाखतीत लवकरच ती आनंदाची बातमी देणार असल्याचं म्हटलं. त्यामुळे चाहते आता गोंधळात पडले आहेत. 





Read More