Sai Tamhankar Photoshoot : बोल्ड आणि हटके फोटोशूटने सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असणाऱ्या सई ताम्हणकरच्या गुडघाभर पाण्यातील फोटोशूटने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पाहा फोटो
मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर नेहमी हटके आणि बोल्ड लुकने चर्चेत असते. नुकतेच अभिनेत्रीने गुडघाभर पाण्यात बोल्ड फोटोशूट केलं आहे.
अभिनेत्रीने तिचे हे फोटो इन्स्टाग्रामवर चाहत्यांसाठी शेअर केले आहेत. सध्या तिच्या या लुकची जोरदार चर्चा होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सई ताम्हणकर तिच्या वेगवेगळ्या लुकने चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
अभिनेत्री शेअर केलेल्या नवीन लुकमध्ये सईचा बोल्ड आणि हॉट अंदाज बघायला मिळत आहे. चाहत्यांनी फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
गुडघाभर पाण्यात सईने जबरदस्त पोज दिल्या आहेत. सध्या सई तिच्या आगामी वेबसीरिज 'मानवत मर्डर्स'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी 'बोल्ड अँड ब्युटीफूल' आणि जबरदस्त अशा वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत.