बोल्ड अभिनेत्री म्हणून सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. नुकतेच तिने तिचे लेटेस्ट लुकमधील फोटो शेअर केले आहेत.
सिंपल लूकसोबतच मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते.
नुकतेच अभिनेत्रीने तिच्या चित्रपटांमधील वेगवेगळ्या भूमिकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
लवकरच अभिनेत्री सई ताम्हणकर 'मानवत मर्डर्स' या वेब सीरीजमध्ये दिसणार आहे. तिचे फोटो देखील व्हायरल होत आहेत.
या वेब सीरीजमध्ये सई 'समिंद्री' नावाचे पात्र साकारत आहे. तिची ही सीरिज 4 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.
अशातच आता सईच्या नवीन लुकने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. तिने मल्टीकलर रंगाच्या ड्रेसमधील हॉट लूक शेअर केला आहे.
सध्या तिच्या या नवीन लुकची चाहत्यांमध्ये खूप चर्चा रंगली आहे. तिच्या फोटोंवर चाहते हटके कमेंट्स करत आहेत.