महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री शिवाली परबने शेअर केले होळीचे फोटो.
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब तिच्या अभिनय आणि सौंदर्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. तिला कल्याणची चुलबुली म्हणून देखील ओळखले जाते.
शिवाली परब ही नेहमी तिचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर होळीचे फोटो शेअर केले आहेत.
तिचे होळीचे फोटो इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. Happy Holi म्हणत तिने चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
चाहत्यांनी शिवाली परबच्या होळीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. शिवालीचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत.
अभिनेत्री शिवाली परबला महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यासोबतच तिने नाटकांमध्ये देखील काम करते.
काही दिवसांपूर्वीच शिवाली परबचा मंगला चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शिवाली परब मुख्य भूमिकेत झळकली होती.
या चित्रपटातील तिच्या अभिनयाचं चाहत्यांसोबत दिग्गज कलाकारांनी देखील कौतुक केलं. अभिनयासोबत ती तिच्या सौंदर्याने देखील खूप चर्चेत असते.