PHOTOS

मराठी फिल्मफेअर 2025: बॉलिवूड स्टार्सनी सजवला सोहळा; जयदीप अहलावतपासून राजकुमार रावपर्यंत अनेकांनी लावली उपस्थिती

marathi filmfare awards 2025: 10 जुलै रोजी मुंबईतील हॉटेल सहारा स्टार येथे 10 वा फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या सोहळ्यात 1 जानेवारी 2024 ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांचा गौरव करण्यात आला. तसेच उत्कृष्ट अभिनय केलेल्या कलाकारांना सन्मानित करण्यात आले. मराठी चित्रपटसृष्टीतील मान्यवरांसोबत बॉलिवूडचे अनेक नामांकित कलाकारही या सोहळ्यास उपस्थित राहून रेड कार्पेटला आणखी सुंदर बनवले आहे.

 

Advertisement
1/7
प्रियांका चोप्राच्या आईसोबत कुटुंबीयांची झलक
प्रियांका चोप्राच्या आईसोबत कुटुंबीयांची झलक

ग्लोबल आयकॉन प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा यांचा मुलगा सिद्धार्थ चोप्रा आणि सून नीलम उपाध्यायसोबत या कार्यक्रमात हजर होत्या. यावेळी मधु चोप्रा प्रेमाने सून नीलमचा हात धरून रेड कार्पेटवर आल्या होत्या. तिघांनीही एकत्र पॅप्ससाठी छान पोज दिल्या.

2/7
अदिती पोहनकर आणि छाया कदमचा ग्लॅमरस अंदाज
अदिती पोहनकर आणि छाया कदमचा ग्लॅमरस अंदाज

या कार्यक्रमात हिंदीसह मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अदिती पोहनकर आणि छाया कदम यांनीही रेड कार्पेटवर हजेरी लावली. अदितीने पीच-सिल्व्हर रंगाच्या ऑफ-शोल्डर बॉडीकॉन ड्रेसमध्ये सर्वांचे लक्ष वेधले, तर छाया रॉयल ब्लू साडीत अत्यंत देखणी दिसत होती.

3/7
ईशा कोप्पीकर आणि जयदीप अहलावतने वेधले लक्ष
ईशा कोप्पीकर आणि जयदीप अहलावतने वेधले लक्ष

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री ईशा कोप्पीकर आणि अभिनेता जयदीप अहलावत यांनी त्यांच्या स्टाइलने उपस्थितांची मने जिंकली. ईशा पीच रंगाच्या साडीत सुंदर दिसत होती, तर जयदीपने पांढऱ्या टी-शर्टवर राखाडी सूट परिधान केला होता.

4/7
महेश मांजरेकर आणि ओम राऊत यांची दमदार उपस्थिती
महेश मांजरेकर आणि ओम राऊत यांची दमदार उपस्थिती

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज महेश मांजरेकर कॅज्युअल लूकमध्ये म्हणजे पांढऱ्या टी-शर्ट आणि जीन्समध्ये दिसले. तर 'आदिपुरुष'चे दिग्दर्शक ओम राऊत यांनी देखील रेड कार्पेटवर विविध पोज देत उपस्थितांचे लक्ष वेधले.

5/7
राजकुमार राव आणि सचिन पिळगावकर यांचा आकर्षक अंदाज
राजकुमार राव आणि सचिन पिळगावकर यांचा आकर्षक अंदाज

अलीकडेच 'मालिक' या अ‍ॅक्शन-थ्रिलरमुळे चर्चेत असलेला राजकुमार राव हलक्या तपकिरी सूट आणि पांढऱ्या टी-शर्टमध्ये रेड कार्पेटवर झळकला. मराठी-हिंदी चित्रपटांचे ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर यांचीही उपस्थिती विशेष ठरली.

6/7
रेणुका शहाणे आणि शिव ठाकरेची खास झलक
रेणुका शहाणे आणि शिव ठाकरेची खास झलक

रेणुका शहाणे आपल्या राखाडी साडीसह गोड हास्याने सर्वांचे लक्ष वेधत होती. तिच्या स्टाईलने चाहते भारावले. बिग बॉस फेम शिव ठाकरेनेही रेड कार्पेटवर येऊन पॅप्ससाठी खास पोज दिल्या.

 

7/7
रोहिणी हट्टंगडी आणि स्मिता जयकर यांचा साड्यांमधील राजेशाही लूक
रोहिणी हट्टंगडी आणि स्मिता जयकर यांचा साड्यांमधील राजेशाही लूक

हिंदी, दक्षिण आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी आणि स्मिता जयकर यांनीही या सोहळ्यात उपस्थित राहून आपला खास अंदाज दाखवला. दोघींनी सुंदर साड्या नेसून विविध पोज देत होत्या. त्यांचा या लूकने सगळ्यांचेच लक्ष त्यांचाकडे वळवले.

 





Read More