PHOTOS

Photos: 'मुलांना पुतळ्याची अंडरपँट दिसते!' अभिनेत्रीचा पुतळा हटवण्यासाठी लोकांनी जमवले 97 लाख

26 Foot Tall Statue: तुमचा विश्वास बसणार नाही पण या पुतळ्याविरुद्ध संपूर्ण शहर एकटवलं, त्यांनी आधी निषेध नोंदवला. त्यानंतरही काही होत नसल्याने त्यांनी एकत्र येत याविरुद्ध मोहिम सुरु केली. जवळपास तीन वर्षांहून अधिक काळ संघर्ष केल्यानंतर आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. जाणून घ्या हे प्रकरण नेमकं आहे तरी काय...

Advertisement
1/9

अनेक आंदोलने, आक्षेप, कोर्टातील याचिका, वादविवाद यानंतर आता या प्रकरणामध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नेमकं काय काय घडलंय आणि हा पुतळा आहे तरी कुठे, लोकांचा नक्की आक्षेप काय आहे पाहूयात...

2/9

अमेरिकेतील सर्वात मादक अभिनेत्री म्हणून ओळख असलेल्या मर्लीन मनरोच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या एका 26 फुटांच्या 'फॉरएव्हर मनरो' नावाच्या पुतळ्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 

 

3/9

1955 साली प्रदर्शित झालेल्या 'द सेव्हन इतर इच' नावाच्या चित्रपटातील स्कर्ट उडणाऱ्या पोजमधील मर्लीनचा हा पुतळा कॅलिफॉर्नियामधील पाम स्प्रिंग्स येथे आहे. या पुतळ्यासंदर्भात मागील अनेक वर्षांपासूबन सुरु असलेल्या कायदेशीर वादानंतर हा पुतळा हटवण्याचं ठरवण्यात आलं आहे.

4/9

2021 साली पाम स्प्रिंग्स येथे मार्लिनचा हा पुतळा बसवण्यात आला. आता हा पुतळा डाऊनटाऊन पार्कमध्ये हलवला जाणार आहे. पाम स्प्रिंग्सचे महापौर जेफरी बर्नस्टीन यांनी या वृत्ताला दुजोरा दिल्याचं 'लॉस एंजलिस टाइम्स'ने म्हटलं आहे. "या प्रकरणावर सर्व मान्य तोडगा निघाल्याने महानगरपालिका फार समाधानी आहे. या प्रकरणामध्ये समाजामध्ये दोन गट पडले होते. मात्र यावर आता तोडगा निघाल्याचं समाधान आहे," असं जेफरी म्हणाले.

5/9

आता मार्लिनचा हा पुतळा 1.5 एकरांच्या पार्कमध्ये हलवला जाणार असला तरी मागील अनेक वर्षांपासून तो वादात राहिला आहे. मार्लिनच्या समर्थकांकडून या कालकृतीचं कौतुक केलं जातं. तर विरोधकांनी या पुतळ्याच्या स्थापनेची जागा चुकल्याचं अगदी याचिकांमध्येही म्हटलं आहे. 

6/9

मार्लिनचा हा पुतळा पाम स्प्रिंग्समधील संग्रहालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे पाठ करुन उभा आहे. मात्र या शिल्पामध्ये मार्लिनचा स्कर्ट उडताना दाखवण्यात आल्याने संग्रहालयातून बाहेर पडणाऱ्यांना या पुतळ्याच्या अंडरपँटकडचा भाग आधी दिसतो. त्यामुळेच पुतळा ज्या पद्धतीने उभारण्यात आला आहे त्यावर अगदी या संग्रहालयाच्या निर्देशकांनाहीच आक्षेप घेतला आहे.

7/9

संग्रहालयाचे निर्देशक लुईस ग्रँकोस यांनी संग्रहालयाला भेट देणाऱ्यांवर मार्लिनच्या या पुतळ्याचा परिणाम होतो असं म्हटलं आहे. खास करुन शालेय विद्यार्थी संग्रहालयामध्ये येतात तेव्हा त्यांच्या नजरेत या पुतळ्याचा पार्श्वभाग येतो. "संग्रहालयाला भेट देणारे खास करुन शालेय विद्यार्थींचं लक्ष मार्लिनच्या पुतळ्याची पाठीमागील बाजू आणि अंडरवेअरवर जातं. संग्रहालयात येताना आणि जातानाही अशीच परिस्थिती असते," असं म्हणत ग्रँकोस यांनी आक्षेप नोंदवला.

8/9

खरं तर मार्लिनच्या या पुतळ्याच्या जागेवरुन 2021 पासूनच वाद सुरु होता. पाम स्प्रिंग्स येथून हा पुतळा काढून टाकल्यानंतर 2021 मध्ये सात वर्षानंतर तो पुन्हा बसवण्यात आला. स्थानिक फॅशन डिझायनर ट्रीना ट्रक यांनी या पुतळ्याच्या स्थानावरुन टीका केली होती. या पुतळ्याचं स्थान अयोग्य आणि लैंगिक भावना उत्तेजित करणारं आहे. ट्रीनाने सुरु केलल्या गो फंड मी कॅम्पेनच्या माध्यमातून स्थानिकांनी हा पुतळा दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी तब्बल 115000 डॉलर्सचा म्हणजेच भारतीय चलनानुसार तब्बल 96 लाख 55 हजार रुपयांचा निधी गोळा केला आहे.

9/9

ट्रीना यांनी, "या प्रकरणामध्ये अनेक गोष्टींचा समावेश आहे. अगदी कायदेशीर लढाईपासून ते आमची बाजू मांडण्यापर्यंत बऱ्याच गोष्टींना खर्च झाला आहे. हा पुतळा हटवला जाईपर्यंत आमची लढाई पूर्ण झाली असं म्हणता येणार नाही," असं म्हटलं आहे. 2021 साली हा पुतळा येथे उभारु नये यासाठी आंदोलनही करण्यात आलेलं. मात्र त्यानंतरही महानगरपालिकेने या ठिकाणी 3 वर्ष हा पुतळा असाच ठेवला होता. आता तो दुसरीकडे हलवला जाणार आहे.





Read More