Entertainment : बॉलिवूड आणि टीव्ही जगतात अशा अनेक अभिनेत्री आहे ज्या अभिनय विश्वात नाव कमावलं पण वैयक्तित आयुष्यात त्यांनी अनेक संकटाचा सामना केला. आज आम्ही अशा अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत. दोन लग्न आणि दोन मुलांनंतर घटस्फोटानंतही ही अभिनेत्री आज एकट्याच जगतंय.
आज आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलत आहोत, तिच्या सौंदर्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावता येणार नाही. आजही तिच्या सौंदर्याने अनेक जण घायाळ होतात.
ही अभिनेत्री आहे श्वेता तिवारी. जिने आपल्या अभिनयाने मालिकांपासून चित्रपटापर्यंत सगळ्यांना वेड लावलं आहे. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेतून श्वेताला घरोघरी पोहोचली आहे. या शोमध्ये 'प्रेरणा शर्मा'ची भूमिका साकारून ही अभिनेत्री टीव्ही जगतात सर्वाधिक प्रसिद्ध अभिनेत्री झाली.
वयाच्या 12 वर्षी तिने अभिनयला सुरुवात केली. चित्रपट आणि मालिकांमध्ये येण्यापूर्वी श्वेता तिवारीने भोजपुरी इंडस्ट्रीत खूप नाव कमावलं आहे.
भोजपुरी इंडस्ट्रीत काम करत असताना श्वेता तिवारी दिग्दर्शक राजा चौधरीच्या प्रेमात पडली आणि नंतर त्यांनी लग्न केलं.
श्वेता दिग्दर्शक राजा चौधरीच्या प्रेमात इतकी वेडी झाली होती की, तिने तिचं करिअरही मागे टाकलं अन् वयाच्या 18 व्या वर्षी ती विवाह बंधनात अडकली. घराच्यांचा विरोधात तिने हे लग्न केलं.
लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांनी श्वेताने एका गोंडस मुलीला जन्म दिला. पलक तिवारी जी आज एक अभिनेत्री आहे. पलकच्या जन्मानंतर जोडप्यामध्ये वादविवाद झाला आणि अखेरीस 9 वर्षांनंतर त्यांचा घटस्फोट झाला. राजावर श्वेताने घरगुती हिंसाचाराचा आरोप केला होता.
2007 मध्ये आपल्या पहिल्या पतीपासून विभक्त झाल्यानंतर श्वेताने पलकाला एकट्याने मोठं केलं. त्यानंत श्वेताच्या आयुष्यात 2012 मध्ये अभिनव कोहलीची एन्ट्री झाली. तिच्या आयुष्यात सुख आलं.
मात्र तिचं हे सुख जास्त काळ टिकलं नाही. 2013 लग्नानंतर तिला मुलगा झाला. पण 2019 मध्ये त्यांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर तिने दोन्ही मुलांचं एकटीने संगोपन केलं.