PHOTOS

5.64 लाख रुपयांच्या कारवर मिळतेय 67,100 रुपयांची सूट, 6 सेफ्टी एअरबॅग अन् 34 किमी मायलेज

मारुती सुजुकीच्या या कारवर मिळतेय 67,100 रुपयांची सूट. 34 किमी मायलेज आणि जबरदस्त फीचर्स. 

...
Advertisement
1/8

मारुती सुजुकी त्यांच्या सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या AMT व्हेरियंट  कारवर जून महिन्यात 67,100 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. 

2/8

त्यासोबतच कंपनी त्यांच्या एमटी आणि CNG व्हेरियंटवर 35 हजार रुपयांची रोख सूट देत आहे. 

3/8

मारुती सुजुकी सेलेरियो या कारची एक्स-शोरुम किंमत 5.64 लाख रुपयांपासून ते 7.37 लाख रुपयांपर्यंत आहे. 

4/8

ही कार CNG आणि पेट्रोलमध्ये येते. ही कार चालवताना कधीच कंटाळा येत नाही. कारण ती प्रति लीटर 26.67 किमी मायलेज देते. 

 

5/8

यामध्ये रोख सवलत 40 हजार रुपये. एक्सचेंज बोनस 15 हजार रुपये. स्क्रॅपेज बोनस 25 हजार रुपये. कॉर्पोरेट सवलत 2100 रुपये. सर्व मिळून 67,100 रुपये इतकी सवलत मिळत आहे. 

6/8

सेलेरियोमध्ये भरपूर स्पेस, मोठी इंफोटेनमेंट स्क्रीन, क्रोम एक्सेंटसोबत ट्विन-स्लॉट एसी वेंट्ससह अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. 

 

7/8

या कारमध्ये 6 एयरबॅग्स, ABS सोबत EBD, हिल होल्ड असिस्टसोबत 12 सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.   

8/8

कंपनीच्या दाव्यानुसार ही कार पेट्रोलमध्ये 26.68 किमी मायलेज देते. तर CNG मध्ये ही कार 34.43 किमी मायलेज देते असा दावा त्यांनी केला आहे. 





Read More