भारतात मोठ्या प्रमाणात 7 सीटर कारला मागणी आहे. कारण मोठे कुटुंब देखील या कारमध्ये आरामदायी प्रवास करू शकते.
देशातील नंबर वन कंपनी ही मारुती कार कंपनी आहे. या कंपनीकडे अनेक कार आहेत ज्यांनी भारतासह इतर ठिकाणांहून देखील मोठी मागणी आहे.
मारुतीच्या या कारमध्ये एक अशी कार आहे, जिची किंमत 5.32 लाख रुपये इतकी आहे. या कारमध्ये 7 लोकांचे कुटुंब अगदी आनंदाने प्रवास करू शकते.
ही कार भारतात खूप प्रसिद्ध आहे. मायलेजमध्ये देखील ही कार जबरदस्त आहे. या कारचे नाव Maruti Suzuki Eeco आहे.
Maruti Suzuki Eeco या कारचा उपयोग विविध कामाकरिता केला जातो. ज्यामध्ये डिलिव्हरी व्हॅन, स्कूल व्हॅन, आणि अॅम्ब्युलन्ससाठी देखील या कारचा वापर केला जातो.
तसेच यामध्ये सीएनजी किटमुळे देखील जबरदस्त मायलेज मिळते. या कारची बेस व्हेरिएंटची किंमत 5.27 लाखांपासून टॉप व्हेरिएंटसाठी 6.53 लाख रुपयांपर्यंत आहे.
या कारच्या इंजिनला 5-स्पीड मैनुअल गियरबॉक्ससह जोडले आहे. ही कार पेट्रोलमध्ये 19.71 किमी प्रति लिटर मायलेज देते. तर CNG मध्ये 26.78 किमी मायलेज देते.
जर तुम्ही मोठ्या कुटुंबासाठी कार घेत असाल तर ही कार उत्तम आहे. या कारमध्ये 7 लोकांचे कुटुंब एकदम आरामात प्रवास करु शकते.