वर नेहमी कोणत्या ना कोणत्या प्रकारची सूट देत असते. अशातच एका कारवर सध्या 1.30 लाख रुपयांची...
मारुती कंपनीने जून महिन्यात त्यांच्या लक्झरी ग्रँड विटारा एसयूव्हीवर या कारवर एक जबरदस्त डिस्काउंट ऑफर दिली आहे.
यामध्ये ग्रँड विटारा एसयूव्हीवर तुम्हाला खरेदी करताना 1.30 लाख रुपयांची सूट मिळणार आहे. यासोबत कंपनी त्यांच्या वेगवेगळ्या व्हेरिएंटवर डिस्काउंट देत आहे.
मारुती कंपनी एसयूव्ही कारवर मोठा डिस्काउंट देत आहे. या एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 11.42 लाख रुपये आहे.
यामध्ये कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना कंपनी कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस, अतिरिक्त ऑफर, ग्रामीण डिस्काउंट अशा ऑफर्स देत आहे.
तसेच कंपनी या कार खरेदी केल्यानंतर 5 वर्षांची वॉरंटी देखील देत आहे. या कारला माइल्ड-हाइब्रिड पावरट्रेन आहे. तसेच 1462cc K15 इंजिन आहे.
माइल्ड हाइब्रिड सिस्टम असणारी ही कार 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिकसह आहे.
मारुती कंपनीच्या सगळ्यात जास्त मायलेज देणाऱ्या कारमध्ये ही कार आहे. यामध्ये मारुती स्ट्रॉन्ग हाइब्रिड e-CVT ही 27.97 किमी मायलेज देते.
या कारला अनेक खास फीचर्स आहेत. ज्याद्वारे सर्व कारची माहिती ही समोर असणाऱ्या स्क्रीनवर मिळते. तसेच या कारला सनरुफ देखील आहे.