PHOTOS

ताज नव्हे, मुंबईतलं हे रेस्तरॉ देशात भारी! कमी किमतीत पंचतारांकित हॉटेलपेक्षा भारी फील, मेन्यू पाहा...

Best Restaurant In India For 2024 :  काही कारणास्तव याच ताज हॉटेलमध्ये जाणं अनेकांना शक्य होत नाही, अशा मंडळींसाठी एक आलिशान हॉटेल कमाल पर्याय ठरत आहे.  

Advertisement
1/9
हॉटेल आणि त्याचा मेन्यू
हॉटेल आणि त्याचा मेन्यू

Best Restaurant In India For 2024 :  हे हॉटेल आणि त्याचा मेन्यू, पदार्थांच्या किमती नेमक्या किती आहेत हे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. बरं, पाहून हे ताजपेक्षा स्वस्त आहे असं म्हटल्यावाचून राहवणार नाही.... आणखी एक कारण म्हणजे यंदाच्या वर्षासाठी हे हॉटेल देशभरात ताजपेक्षाही कमाल ठरलं आहे. 

2/9
Best Restaurant In India For 2024
Best Restaurant In India For 2024

Best Restaurant In India For 2024 : Seoul मध्ये नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात आशिया खंडातील सर्वोत्तम 50 रेस्तराँची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये टोक्योतील Sezanne, Florilege  आणि बँकॉकमधील Gaggan Anand या हॉटेलांचा समावेश होता. या यादीत भारतातील तीन रेस्तराँचीही नावं पुढे आली. 

3/9
आंतरराष्ट्रीय यादीत स्थान मिळवणारे रेस्तराँ
आंतरराष्ट्रीय यादीत स्थान मिळवणारे रेस्तराँ

आंतरराष्ट्रीय यादीत स्थान मिळवणाऱ्या देशातील तीन रेस्तराँमध्ये यादीत 23 व्या स्थानी असणारं मुंबईतील Masque, 26 व्या स्थानी असणारं नवी दिल्लीतील Avartana आणि 44 व्या स्थानी असणारं चेन्नईतील  ITC Grand Cholaचा समावेश आहे. Masque या हॉटेलला सलग दुसऱ्यांदा भारतातील सर्वोत्तम रेस्तराँ हा बहुमान मिळाला आहे. 

 

4/9
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची वर्णी
शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची वर्णी

पुरस्कारांवेळी उल्लेख केल्यानुसार, Masque मुंबईमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांचा टेन कोर्स मिल सादर केला जातो. पाणी पुरीपासून पारंपरिक भारतीय चवींना इथं नव्या अंदाजात सादर केलं जातं. 

 

5/9
खर्च
खर्च

Masque मुंबईच्या मेन्यूबाबत सांगावं तर, इथं 450 रुपयांचे आलू समोसा चाट आणि किमा समोसा असे दोन सर्वात स्वस्त पदार्थ आहेत. ज्यामधील पहिला शाकाहारी तर दुसरा मांसाहारी आहे. 

6/9
मेन कोर्स
मेन कोर्स

हॉटेलच्या मेन्यूवर मेनकोर्समध्ये, ब्लॅक बिन हरिसा विथ मश्रूम कबाब, लॅम्ब हरिसा विथ लॅम्ब कबाब, पनीर पसंदा, दाल मखनी, बटर चिकन, मोरेल यखनी पुलाव, लॅम्ब बिर्यानी असे पदार्थ असून, त्यांचे दर साधारण 750 रुपयांपासून 1250 रुपये (कर न जोडता) इतके आहेत.

7/9
क्लासिक मेन्यू
 क्लासिक मेन्यू

हॉटेलच्या क्लासिक मेन्यूवर फ्राईड चिकन, ब्रिस्केट बर्गर, मश्रून सँडो हे पदार्थ आहेत. तर, साईड डिशेसमध्ये मिर्च अजवाईन परांठा, घी राईस असे पदार्थ आहेत. गोडाच्या पदार्थांमध्ये हे हॉटेल तुम्हाला कश्मिरी चेरी अँड चॉकलेट आईस्क्रीम, घेवर विथ रबडी अँड मँगो असे पदार्थ देतं ज्यासाठी 650 रुपये मोजावे लागतात. 

8/9
विविध प्रकारची मद्य
विविध प्रकारची मद्य

विविध प्रकारची मद्य, म्हणजेच व्हिस्की, रम, वाईन, जिन, अमेरिकन आणि आयरिश व्हिस्की, वोडका, ब्रँडीसुद्धा इथं उपलब्ध आहे. पण, त्यासाठी 2 ते 3.5 हजार रुपये मोजावे लागतात. 

 

9/9
मुंबईतील महालक्ष्मी इथं हे रेस्तराँ
मुंबईतील महालक्ष्मी इथं हे रेस्तराँ

मुंबईतील महालक्ष्मी इथं हे रेस्तराँ असून, अतिशय खास प्रसंगी जेवणाचा आनंद घेण्यापेक्षा काहीतरी भन्नाट अनुभव घ्यायचा असेल तर हे हॉटेल अनेकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतं. कारण, हे आहे देशातील 'एक नंबर' हॉटेल. (सर्व छायाचित्रे- Masque Mumbai / instagram)

 





Read More