Monthly Horoscope May 2025 in Marathi : ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून, मे महिना काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे. तर काही राशींना खूप धावपळ आणि अधिक मेहनत करावी लागणार आहे. मे महिन्यात 6 मे रोजी बुध ग्रह हा मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. महिन्याच्या शेवटी, वृषभ राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. याशिवाय मे महिन्यात गुरु, राहू आणि केतूचे भ्रमण असणार आहे. या महिन्यात मिथुन, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना ज्योतिषीय गणना प्रचंड फायदे प्राप्त होणार आहे. मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी मे महिना कसा असणार आहे जाणून घ्या ज्योतिष तज्ज्ञ आणि आनंदी वास्तूचे आनंद पिंपळकर यांच्याकडून
या राशीच्या लोकांना मे महिन्यात त्यांचे पैसे आणि वेळ काळजीपूर्वक व्यवस्थापित करावे लागणार आहे. तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातही गोडवा ठेवावा लागणार असून या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला जास्त मेहनत करावी लागणार आहे. पण, यानंतर परिस्थितीत काही सुधारणा दिसून येणार आहे. मित्र आणि नातेवाईकांकडून मदत मिळणार आहे. यामुळे तुमचे प्रलंबित काम पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे. व्यवसायासाठी हा महिना चांगला राहणार आहे. आरोग्यही ठीक राहणार आहे पण महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याबद्दल काळजी राहणार आहे. तर नातेसंबंधांबद्दल सावधगिरी बाळगावी लागणार आहे. चिथावणी देण्याऐवजी किंवा दिशाभूल करण्याऐवजी तुमचा विवेकचा वापर करा. धोकादायक गुंतवणुकीमुळे तुमचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत, शहाणपणाने पुढे जाणे गरजेचे असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये शहाणपणाने पुढे जा. जोडीदाराशी वाद होण्याची संकेत आहेत. वैवाहिक जीवनात, तुमच्या जोडीदाराच्या भावनांचीही काळजी घ्यावी लागणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी मे महिना सुरुवातीला अधिक शुभ असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला, तुमच्या कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून प्रशंसा प्राप्त होणार आहे. तुमचा आदर वाढणार आहे. करिअर आणि व्यवसायात इच्छित परिणाम आणि लाभ मिळणार असल्याने मन प्रसन्न राहणार आहे. महिन्याच्या पहिल्या सहामाहीत अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहे. महिन्याच्या मध्यात विवाहित लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनात काही समस्या येण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्येही समस्या होणार आहेत. यावेळी काळजीपूर्वक विचार करूनच निर्णय घेणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. महिन्याच्या शेवटी, कठोर परिश्रम करून तुम्हाला काही विशिष्ट कामात यश प्राप्त होणार आहे. व्यवसायानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागणार आहे. या काळात तुमच्या वस्तू आणि आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या योजना गोपनीय पद्धतीने राबवा, अन्यथा तुम्हाला तुमच्या विरोधकांकडून अडथळे निर्माण होऊ शकतात. परदेशात काम करणाऱ्यांना महिन्याच्या मध्यात अनपेक्षित यश आणि नफा मिळणार आहे. चढ-उतार येतील पण तुम्हाला तुमच्या पालकांचा पूर्ण पाठिंबा प्राप्त होणार आहे. महिन्याच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे.
मे महिना या राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. या महिन्यात, या राशीखाली जन्मलेले लोक त्यांच्या बोलण्याने आणि वागण्याने इतरांना प्रभावित करणार आहेत. महिन्याच्या सुरुवातीला तुम्ही व्यवसाय किंवा करिअरशी संबंधित सहलीला जाणार आहात. यामुळे तुम्हाला मोठे यश आणि नफा मिळणार आहे. प्रवासादरम्यान तुमच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. नोकरदारांसाठी हा काळ चांगला राहणार आहे. तुम्हाला उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत मिळणार आहेत. आर्थिक परिस्थिती मजबूत होणार आहे. घरात आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. महिन्याच्या मध्यात, तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीबद्दल काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. या काळात घरी धार्मिक कार्ये पूर्ण करता येणार आहे. या काळात, तुम्हाला तुमच्या भावंडांकडून महत्त्वाच्या निर्णयांमध्ये पूर्ण मदत आणि पाठिंबा मिळणार आहे. जमीन, इमारत, वाहन इत्यादी खरेदी-विक्रीशी संबंधित तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत हा महिना शुभ असणार आहे. तुमच्या भावना कोणासमोर व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल राहणार आहे. जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल, तर तुमचे कुटुंब तुमच्या नात्यावर लग्नाला मान्यता देणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी राहणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी मे महिन्याचा दुसरा भाग पहिल्यापेक्षा अधिक अनुकूल असणार आहे. पण महिन्याच्या सुरुवातीला प्रभावित होऊ नका. शिवाय काळजीपूर्वक विचार करून कोणताही निर्णय घ्या. या काळात तुम्हाला नातेवाईक आणि जवळच्या मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. यामुळे तुम्हाला थोडे दुःख होणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, तुम्हाला तुमच्या कुटुंबासह लांब किंवा कमी अंतराच्या सहलीला जाण्याचे योग आहेत. इच्छित आर्थिक लाभ मिळविण्यासाठी, तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंमत गमावू नका. धैर्य कायम ठेवा. गोंधळाच्या परिस्थिती टाळणे हिताचे ठरणार आहे. तुम्ही प्रियजनांकडून किंवा हितचिंतकांकडून सल्ला घ्या. महिन्याचा पहिला भाग तुमच्यासाठी अनुकूल नसेल पण दुसऱ्या भागात नशीब पूर्णपणे तुमच्या बाजूने असणार आहे. चांगल्या मित्रांसोबत काम केल्याने नफा मिळणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ सामान्य राहणार आहे. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होणार आहे. व्यवसायात तुम्हाला अपेक्षित नफा प्राप्त होणार आहे. कोणत्याही धोकादायक योजनेत गुंतवणूक करु नका. तर तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये खोली निर्माण होणार आहे. तुम्ही तुमच्या प्रेम जोडीदारासोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. वैवाहिक जीवन गोड असणार आहे.
मे महिन्याच्या सुरुवातीला या राशीच्या लोकांना जवळच्या मित्रांकडून आणि कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. या काळात इच्छित परिणाम वेळेवर साध्य होणार आहे. विशेष म्हणजे बाजारात अडकलेले तुमचे पैसे अनपेक्षितपणे येणार आहे. ज्यामुळे तुम्हाला सुटकेचा नि:श्वास घेता येणार आहे. तुमच्या भावंडांची मदत घ्यावी लागणार आहे. यामुळे तुम्हाला अतिरिक्त फायदे मिळणार आहेत. तुम्ही जमीन आणि इमारत खरेदी-विक्रीची योजना आखणार आहात. महिन्याच्या मध्यात कोणतेही महत्त्वाचे काम करताना अधिक काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागणार आहे. यात कोणत्याही प्रकारची घाई करू नका, नाहीतर मोठी चूक घडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक तुमचे लक्ष तुमच्या ध्येयांपासून विचलित करण्याचे प्रयत्न करतील. तर कामाच्या ठिकाणी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यामुळे मे महिन्यात सुरक्षित राहा. जवळच्या मित्रांसोबत काही वैचारिक मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत छोट्या छोट्या गोष्टींना महत्त्व न देणेच हिताचे ठरणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत परिस्थिती बदललेली दिसणार आहे. तुमचे काम चांगले होणार आहेत. योग्य निर्णय घेण्यास सक्षम असणार आहात. जवळच्या मित्रांसोबत सुरू असलेले गैरसमजही दूर होणार आहे. यावेळी तुम्हाला प्रेमसंबंधांमध्ये यश प्राप्त होणार आहे. जोडीदारासोबत चांगले नाते निर्माण होणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत छान वेळ व्यतित करणार आहात. आरोग्य देखील सामान्य राहणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. या महिन्यात तुम्हाला कधी आनंद तर कधी दुःख अनुभवायला मिळणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी आणि कनिष्ठांकडून सहकार्य प्राप्त होणार आहे. काम सहज पूर्ण होणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात, कामाशी संबंधित अडथळे मोठ्या चिंतेचे कारण बनण्याची शक्यता आहे. तुमच्या भावनांवर आधारित काम करण्यासाठी तुमच्या कुटुंबावर दबाव आणू नका, अन्यथा ते नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे. कोणाशीही अनावश्यक वाद करु नका. कुटुंब आणि कामाच्या ठिकाणी एकत्र काम केल्याने तुम्हाला अपेक्षित यश मिळणार आहे. महिन्याच्या शेवटी तुम्हाला नातेसंबंध आणि आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. तुमच्या खाण्याच्या सवयींची पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर ते वेळेवर घ्या. आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. तुम्हाला तुमचा वेळ आणि पैसा व्यवस्थापित करावा लागणार आहे. तुमच्या प्रियकराच्या आयुष्यात जास्त ढवळाढवळ करु नका. तुमच्या व्यस्त वेळापत्रकात तुमच्या जोडीदारासाठी थोडा वेळ नक्की काढा. आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणरा आहे.
या राशीच्या लोकांसाठी हा महिना मिश्रित परिणाम घेऊन येणार आहे. यशासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक असणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा भार वाढणार आहे. ज्यामुळे मानसिक दबाव येण्याची शक्यता आहे. घरात आणि बाहेर अनावश्यक वाद आणि संघर्षांपासून दूर राहणे तुमच्या हिताचे ठरणार आहे. या महिन्यात आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. आर्थिकदृष्ट्या, हा काळ काही अडचणींनी भरलेला असणार आहे. व्यवसायात चढ-उतार येणार आहे. उत्पन्न आणि खर्च यांच्यातील संतुलन राखणे आव्हानात्मक असणार आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. महिन्याच्या शेवटी तुम्हाला थोडा आराम मिळणार आहे. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होणार आहे. व्यवसायात सुधारणा पाहिला मिळणार आहे. जर तुम्ही आधीच प्रेमसंबंधात असाल तर प्रामाणिकपणे नातेसंबंध टिकवा, अन्यथा परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी ठेवण्यासाठी, तुमच्या जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष करणे टाळा.
मे महिन्याचा दुसरा भाग या राशीच्या लोकांसाठी अधिक शुभ आणि यशाने भरलेला असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मिश्रित परिणाम पाहिला मिळतील. व्यवहारात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कुटुंबात किंवा कामाच्या ठिकाणी इतरांवर तुमचे विचार लादू नका. अन्यथा, तुमची प्रतिष्ठा धोक्यात येण्याची शक्यता आहे. महिन्याच्या सुरुवातीला, जवळच्या मित्रांकडून आणि सहकाऱ्यांकडून अपेक्षित मदत प्राप्त होणार नाही. तुम्हाला थोडे दुःख वाटणार आहे. आरोग्यही थोडे कमकुवत राहणार आहे. पोटाशी संबंधित काही समस्या उद्भवणार आहे. तुमच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्येकडे पूर्ण लक्ष देणे गरजेचे असणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या भागात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. अचानक मोठे खर्च येणार आहेत. घराच्या दुरुस्तीपासून ते भौतिक सुखसोयींपर्यंत खर्च होणार आहे. महिन्याचा शेवटचा भाग करिअर आणि व्यवसायासाठी चांगला राहणार आहे. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा इच्छित बदली मिळणार आहे. व्यवसायात अनपेक्षित नफा प्राप्त होईल. कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होणार आहे. प्रेमसंबंध अधिक दृढ होणार आहे. तुम्हाला तुमचे प्रेम दाखवणे टाळावे लागणार आहे, अन्यथा तुम्हाला अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तुमचे वेळापत्रक व्यस्त असेल, तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढणे थोडे कठीण राहणार आहे.
मे महिना या राशीच्या लोकांसाठी भरभराटी घेऊन येणार आहे. जर तुम्ही या महिन्यात तुमचा वेळ आणि पैसा व्यवस्थापित केला तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त यश आणि नफा मिळणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला, जमीन आणि इमारतीशी संबंधित वाद मिटणार आहे. किंवा खरेदी-विक्रीशी संबंधित काम मार्गी लागणार आहे. तुम्ही तुमच्या धैर्याने अनेक मोठे आणि फायदेशीर निर्णय घेणार आहात. तुम्ही तुमच्या कुटुंबासह लांब किंवा कमी अंतराच्या तीर्थयात्रेला जाणार आहेत. महिन्याच्या दुसऱ्या भागात, कुटुंबाशी संबंधित कोणताही मोठा निर्णय घेताना तुम्हाला तुमच्या पालकांकडून आणि कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळणार आहे. करिअर आणि व्यवसायात चांगली प्रगती पाहिला मिळणार आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला असणार आहे. प्रेम जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात प्रेम जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण व्यतित करणार आहेत.
मे महिन्यात मकर राशीच्या लोकांना काही चढ-उतारांना सामोरे जावे लागणार आहे. या महिन्यात तुम्हाला तुमचे काम पुढे ढकलणे महाग पडू शकतं. काम वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणे हिताचे ठरेल. मे महिन्यात तुम्हाला अपमान आणि अहंकार टाळावा लागणार आहे. तुमच्या बोलण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण ठेवणे गरजे असून नम्र राहणे हेच हिताचे ठरेल. विरोधकांपासून सावध राहा. या राशीच्या लोकांना त्यांच्या कामात यश मिळविण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद होण्याची शक्यता आहे तर ते टाळलेले बरं ठरेल. या महिन्यात तुम्ही कमी अंतराच्या सहलीला जाऊ शकता. प्रवासादरम्यान तुमच्या आरोग्याची आणि सामानाची काळजी घ्यावी लागणार आहे. महिन्याच्या शेवटी आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घ्या. या काळात धोकादायक योजनांमध्ये पैसे गुंतवू नका. प्रेम जीवनात प्रामाणिक राहा. तुमच्या मुलांकडून तुम्हाला चांगली बातमी मिळणार आहे. तुमचे वैवाहिक जीवन गोड बनवण्यासाठी, तुमच्या जोडीदाराच्या भावना समजून घेणे हिताचे ठरणार आहे. तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य प्राप्त होणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी मे महिना कधी आनंद घेऊन येईल तर कधी दुःख. या महिन्यात तुम्हाला तुमच्या गोष्टी कधी चांगल्या होत असल्याचे दिसेल तर कधी वाईट होताना जाणवणार आहे. तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत संयम राखावा लागणार आहे. बुद्धिमत्ता आणि कठोर परिश्रमाने तुम्ही तुमचे ध्येय साध्य करणार आहात. जर तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर तुम्ही खात्यांवरही लक्ष द्या. आरोग्याच्या दृष्टिकोनातून, मे महिन्याच्या शेवटी तुम्हाला अधिक काळजीचा असणार आहे. काही जुना आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या विरोधकांपासून सावध राहा, अन्यथा तुम्हाला अपमानाला सामोरे जावे लागणार आहे. तुमच्या कोणत्याही योजना अंमलात आणण्यापूर्वी उघड करू नका. अनावश्यक वाद टाळा. भावनिकतेने किंवा घाईघाईने कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. करिअर आणि व्यवसाय इत्यादींशी संबंधित निर्णय घेताना तुम्ही तुमच्या हितचिंतकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरणार आहे. प्रेमसंबंधात हुशारीने पुढे जा, अन्यथा तुम्हाला अनेक अनावश्यक समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे संबंध चांगले राहतील.
या राशीच्या लोकांना मे महिन्यात घाईघाईने किंवा भावनिक निर्णय घेणे टाळावे लागणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कुटुंबाशी संबंधित काही मोठी समस्या उद्भवू शकते. नातेवाईकांच्या मदतीने या समस्या सोडवणे चांगले होणार आहे. नशिबावर अवलंबून राहू नका आणि खूप प्रयत्न करा. योजनेनुसार काम केल्यानेच महत्त्वाच्या कामांमध्ये यश प्राप्त होणार आहे. महिन्याच्या मध्यात विद्यार्थ्यांना अभ्यासात रस कमी असेल. ते त्यांचा बहुतेक वेळ मौजमजेत घालवतील. मुलांशी संबंधित कोणतीही मोठी चिंता तुम्हाला त्रासदायक ठरणार आहे. महिन्याच्या शेवटी विरोधक सक्रिय राहणार आहे. तुम्हाला ज्ञात आणि अज्ञात विरोधक आणि शत्रूंपासून सावध राहावे लागणार आहे. तुमचा राग नियंत्रित ठेवा. कोणाच्याही फसवणुकीत किंवा चिथावणीत अडकू नका, अन्यथा तुम्ही कोणतेही चुकीचे पाऊल उचलू शकता. प्रेमसंबंधांमध्ये अडथळे येऊ शकतात. जर तुमच्या प्रेम जोडीदारासोबत गैरसमज झाला असेल तर तो सोडवण्यासाठी तुमच्या महिला मैत्रिणीची मदत घ्यावी लागणार आहे. आयुष्यातील कठीण काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. तुमच्या घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीचे आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण बनण्याची शक्यता आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती टॅरो कार्डवर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)