बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच या चित्रपटात विभीषणाची भूमिका साकारण्यास प्रसिद्ध अभिनेत्याने नकार दिला आहे. कोण आहे तो अभिनेता?
नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित 'रामायण' चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. चाहते हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर हा भगवान श्री रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अभिनेत्री साई पल्लवी ही माता सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.
याच चित्रपटातील आणखी एक मोठे नाव समोर आले आहे. ज्याला प्रमुख भूमिकेची ऑफर देण्यात आली होती. ज्यामध्ये तो विभीषणाची भूमिका साकारणार होता.
मात्र, अभिनेता जयदीप अहलावतने नुकताच खुलासा केला की, त्याने नितेश तिवारी यांच्या 'रामायण' चित्रपटातील विभीषणाच्या भूमिकेला नकार दिला होता.
कारण यशसोबत त्याच्या तारखा ठरवणे शक्य होत नव्हते. त्यामुळे त्याने नकार दिला. या चित्रपटात यशने रावणाची भूमिका साकारली आहे.
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्राच्या प्राइम फोकस स्टुडिओज आणि यशच्या मॉन्स्टर माइंड क्रिएशन्स निर्मित 'रामायण' भाग 1 हा 2026 रोजी दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
तर या चित्रपटाचा दुसरा भाग 2027 मध्ये दिवाळीच्या वेळी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दोन मोठे कलाकार हे मुख्य भूमिकेत आहेत.
या चित्रपटात सनी देओल हनुमानाची भूमिका साकारणार आहे. काजोल अग्रवाल ही रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारत आहे.