राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
राज्यातील हवामानात काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. अशातच आता परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला आहे.
परतीच्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. अशातच विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
पुण्यात ढगाळ वातावरण राहणार असल्याचा अंदाज आहे. तर घाट भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा, राधानगरी, चंदगड आणि शाहूवाडी या ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील माढा, मोहोळ, सांगोला, करमाळा, पंढरपूर या ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
सांगली जिल्ह्यात देखील दमदार पावसाची शक्यता देण्यात आली आहे. गेल्या 2 दिवसांपासून याठिकाणी कधी ऊन तर कधी हलका पाऊस पडत आहे.