Mhada Lottery 2023 : म्हाडाच्या घराच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी आणि तितकीच महत्त्वाची बातमी. नव्यानं जाहीर करण्यात आलेल्या यादीत तुमचं नाव आहे का?
Mhada Lottery 2023 : म्हाडाकडून दीड लाख नावांची यादी जाहीर; पाहा यात तुमचं नाव आहे का....
Mhada Lottery 2023 : मुंबईतून हद्दपार होत चाललेल्या मध्यमवर्गीय मराठमोळ्या कुटुंबांना या शहरात पुन्हा एकदा हक्काचं घर मिळवून देण्याची संधी म्हाडाकडून देण्यात येत आहे. आताच हीच संधी एका खास वर्गाला मिळणार आहे.
कारण, नुकतीच म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून दीड लाख कामगारांच्या नावाची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ज्या धर्तीवर गिरणी कामगारांसाठी तब्बल 2521 घरांची सोडत लवकरच काढण्यात येणार आहे. यासोडतीसाठीची जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे.
सोडतीसाठी MMRDA च्या भाडेतत्त्वावरील प्रकल्पातील मे. टाटा हौसिंग कंपनी लिमिटेड, रांजनोळी, ठाणे येथील 1244, श्री विनय अगरवाल शिलोटर, रायचूर, रायगड येथील 1019 आणि मे. सांवो व्हिलेज, कोल्हे येथील 258 अशी एकूण 2521 घरं म्हाडानं गिरणी कामगारांसाठी उपलब्ध केली आहेत.
दरम्यान सर्वाधिक संख्या असणाऱ्या रांजनोळीतील घरांची दुरवस्था पाहता या घरांची दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणाची यावरून सुरु असणारा वाद निकाली निघाला नसल्यामुळं ही सोडत लांबणीवर पडत आहे.
किंबहुना अद्यापही हा वाद निकाली निघालेला नसताना म्हाडानं मात्र तेथील घरांचा समावेश सोडतीमध्ये करण्याचा निर्णय घेत सोडतीच्या दृष्टीनं एक पाऊल पुढं टाकलं आहे.
सदर प्रक्रियेअंतर्गत मंडळाकडे सादर झालेल्या आणि सोडतीत आतापर्यंत यशस्वी न ठरलेल्या अर्जदारांची नावं असल्याचं कळत आहे.
थोडक्यात आता अर्जदारांनी म्हाडाच्या यादीत आपल्या नावाचा समावेश आहे की नाही याची खात्री करून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे.