Michael Vaughan T20 World Cup Finalist 2024: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये (T20 World Cup 2024) पोहोचणाऱ्या संघाची नावं मायकल वॉर्नने सांगितली आहेत. सेमीफायनलमध्ये कोणते संघ पोहोचतील यावर मायकल वॉर्नने मोठी (Michael Vaughan prediction) भविष्यवाणी केली आहे.
वेस्टइंडीज आणि अमेरिकेमध्ये होणाऱ्या आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. 20 संघात होणारे 55 सामने अधिकच रोमांचक असणार आहे.
टीम इंडिया 5 जूनपासून क्रिकेटच्या महाकुंभाला सुरूवात करेल. टीम इंडियाचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध खेळेल. तर 9 तारखेला भारत पाकिस्ताविरुद्ध दोन हात करेल.
अशातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉर्न याने मोठी भविष्यवाणी केली आहे. टी-ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये कोणते संघ पोहोचतील? यावर वॉर्नने भाष्य केलंय.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मायकल वॉर्न याने भविष्यवाणी केलेल्या संघांमध्ये ना टीम इंडियाचं नाव आहे, ना पाकिस्तान संघाचं...
पाकिस्तानचं नाव नसणं हे स्वभाविक आहे, पण दमदार फॉर्ममध्ये असलेल्या टीम इंडियाचा उल्लेख देखील मायकल वॉर्नने केला नाही.
मायकल वॉर्नने सांगितलेल्या संघांमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रीका आणि वेस्टइंडीज या चार संघांचं नाव आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), शिवम दुबे, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, युजवेंद्र चहल, संजू सॅमसन (विकेटकीपर), मोहम्मद सिराज.