आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी टीम इंडियाचा स्टार लेग स्पिनर युझी चहल याला आरसीबीने रिलीज केलं होतं. मात्र, त्याला पुन्हा आरसीबीला (RCB) संघात घेता आलं नाही. त्यावर संचालक माईक हेसन यांनी मोठा खुलासा केला आहे.
आयपीएलच्या नव्या नियमांनुसार, आम्ही फक्त 3 खेळाडू ठेवले होते. यामध्ये विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल आणि मोहम्मद सिराज या तीन खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला गेला.
यझुवेंद्र चहल आमच्यासाठी टॉप 5 प्लेयरमध्ये होता. चहलला आणि हर्षल पटेलला आम्हाला पुन्हा संघात घेयचं होतं, असं माईक हेसन यांनी सांगितलं.
केवळ तीन खेळाडूंना रिटेन केल्याने आम्हाला फक्त अतिरिक्त चार कोटी मिळाले होते. विराट 15 कोटी, मॅक्सी 11 कोटी आणि सिराजला 7 कोटी खर्च झाला होता.
पण झालं असं की, युझी आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक असून देखील तो पहिल्या दोन मार्की यादीत स्थान मिळवू शकला नाही, त्याचा क्रमांक 65 व्या यादीत आला.
त्यामुळे युझीला आम्ही संघात घेऊ शकतो, याची शक्यता फार कमी झाली होती. आम्ही सर्व गोलंदाज सोडले असते, तरीही युझीला संघात घेण्यात अयशस्वी झालो असतो.
युझीसाठी आम्ही इतर खेळाडूंना न घेणं हा मुर्खपणा ठरला असता. जर युझी देखील गेला असता तर आम्हाला लेग स्पिनरशिवाय खेळावं लागलं असतं, असं हेसन म्हणातात.
मात्र, आम्ही युझीला संघात घेण्यासाठी चर्चा केली, तसेच आम्ही तासन् तास घालवला होता. तरीदेखील आम्हाला त्याला घेता आलं नाही, असा खुलासा माईक हेसन यांनी केला आहे.