PHOTOS

सुपरस्टार अभिनेत्याच्या मुलाचा पहिलाच चित्रपट फ्लॉप, 1 वर्ष घराबाहेर ठेवलं नाही पाऊल, ओळखलं का?

ून त्यांची मुले देखील बॉलिवूडवर राज्य करत आहेत. पण एक असा सुपरस्टार आहे, ज्याच्या ...

Advertisement
1/7

बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार आहेत. ज्यांची मुले देखील सध्या बॉलिवूडवर राज्य करत आहेत. सुपरस्टार अभिनेत्याच्या काही मुलांना पहिल्याच चित्रपटातून यश मिळालं आहे. 

2/7

पण काही सुपरस्टार कलाकारांची मुलं ही पहिल्याच चित्रपटात अपयशी ठरले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. 

3/7

ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्ती हा गेल्या अनेक दिवसांपासून चित्रपटसृष्टीमध्ये सक्रिय आहे. मात्र, त्याची कारकीर्द फार काही चांगली नव्हती. 

4/7

मिमोह हा त्याच्या वडिलांप्रमाणे यशस्वी स्टार बनू शकला नाही. परंतु, तो अजूनही बॉलिवूडमध्ये चांगले काम करण्यासाठी संघर्ष करत आहे.  

5/7

काही दिवसांपूर्वीच मिमोहने त्याचा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्याच्यासोबत काय घडलं होते याचा खुलासा केला आहे. त्यासोबतच सलमानने सुरुवातीला आणि त्यानंतरही पाठिंबा कसा दिला याबाबत खुलासा केला आहे. 

6/7

एका मुलाखतीत मिमोह चक्रवर्तीने सांगितले की, सलमान खानने 2008 मध्ये प्रदर्शित झालेल्या त्याच्या पहिल्या चित्रपट 'जिमी'ला पाठिंबा दिला होता. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. 

7/7

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांचे फोन बदलले गेले. चेक बाऊन्स झाले, सर्वजण गायब झाले.माझं जग उध्वस्त झाल्यासारखं वाटलं. मला खूप वाईट वाटले. मी एक वर्ष घराबाहेर पडलो नाही असं त्याने सांगितलं. 





Read More