Mirzapur 3 : मिर्झापूर 3 सिझनचा शायराना अंदाजातील अभिनेता रहीम उर्फ पल्लव सिंह नेमका आहे कोण? जाणून घ्या सविस्तर. मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.
मिर्झापूरचा सिझन 3 आता रिलीज झाल्यापासून चर्चेत आहे. अनेकांना मिर्झापूरचा तिसरा पार्ट आवडलेला नाही. पण या सगळ्यात एका पात्राची तुफान चर्चा होतीये.
मिर्झापूरमधील रहीम हे पात्र अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. आपल्या शायरीमुळे अडचणीत सापडलेला रहीम नेमका कोण आहे? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल.
'मिर्झापूर 3' मध्ये रहीमची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याचे खरं नाव पल्लव सिंह आहे. पल्लवने 'मिर्झापूर'पूर्वी अनेक वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.
पल्लव सिंह हा थिएटर आर्टिस्ट आहे. पल्लवने साक्षी तन्वरच्या 'माई' आणि 'ताज: डिव्हाइड बाय ब्लड'मध्ये त्याने काम केलंय.
पल्लवने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनय शिकला. एवढंच नाही तर त्यांनी अनेक नाटकंही लिहिली आहेत. पल्लव इंजिनियर देखील आहे.