PHOTOS

Miss Universe 2023 : भारताची दिविता राय बनली ‘सोने की चिडिया’, मिस युनिव्हर्स स्पर्धेत घातला अनोखा पोशाख, पाहा Exclusive Photo

भारताचे प्रतिनिधित्व करणारी दिविता राय ही कर्नाटकातील 25 वर्षीय मॉडेल आहे. तिने या स्पर्धे आपल्या वेशभूषेने सर्वांची मने जिंकली. नॅशनल कॉस्च्युम राऊंडमध्ये दिविता 'सोने की चिडिया'च्या अवतारात स्टेजवर उतरली आहे. 

 

Advertisement
1/5

दिविताने आर्किटेक्ट म्हणून शिक्षण घेतले असून सध्या ती मुंबईत राहते. ही स्पर्धा अमेरिकेतील लुईझियाना येथे आयोजित करण्यात आली आहे. 

2/5

मिस युनिव्हर्स स्पर्धेत दिविता रायने असा पोशाख परिधान केला ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटत आहे. या फेरीसाठी दिविता 'सोने की चिडिया' असा गोल्डन ड्रेस परिधान करून स्टेजवर आली आहे. 

3/5

या कार्यक्रमासाठी तिचा आउटफिट अभिषेक शर्माने डिझाइन केला. 71वी मिस युनिव्हर्स स्पर्धा अमेरिकेतील लुईझियाना येथे आयोजित करण्यात आली असून यामध्ये जगभरातील 80 हून अधिक देशांतील सौंदर्यवती यांचा सहभाग आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी 14 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.

 

4/5

डिझायनर अभिषेकने इंस्टाग्राम पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा ड्रेस आपल्या देशातील कारागिरांच्या उत्कृष्ट कारागिरीचे उदाहरण आहे. हा पोशाख मध्य प्रदेशातील चंदेरी जिल्ह्यात हाताने बनवलेल्या टिश्यू फॅब्रिकपासून बनविला गेला आहे, जो आधुनिक भारताची प्रतिमा देखील दर्शवतो.

5/5

दिविताने मिस दिवा युनिव्हर्स 2022 चा किताब जिंकला आहे. जेव्हा दिविताने दिवा युनिव्हर्सचा किताब जिंकला तेव्हा तिला मिस युनिव्हर्स 2021 हरनाज संधूने मुकुट घातला. 2018 मध्ये, दिविताने फेमिना मिस इंडिया ब्यूटी पेजेंट स्पर्धेत भाग घेतला, ज्यामध्ये ती दुसरी उपविजेती होती. 





Read More