मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरचे इंस्टाग्रामवर फॉलोवर्स 40 लाखाहून अधिक झाले आहेत. मात्र अजूनही ती प्रिया प्रकाशच्या मागेच आहे. प्रियाचे फॉलोवर्स 61 लाख आहेत.
मानुषीचे 25जुलै 2018 पर्यंत 356 पोस्ट शेअर झाल्या आहेत. तर प्रियाच्या 101 पोस्ट आहेत. मानुषीच्या पोस्टमध्ये तिच्या ड्रेसचं खास कौतुक होतं. प्रिया प्रकाशच्या पोस्ट अनेक प्रकारच्या असतात.
हरियाणाची मानुषी छिल्लर 2017 साली मिस वर्ल्ड झाली. यापूर्वी रीता फारिया (1966), ऐश्वर्य राय (1994), डायना हेडन (1997), युक्ता मुखी (1999) आणि प्रियंका चोपड़ा (2000) ने हा किताब पटकावला.
मिस वर्ल्ड ठरलेल्या या सौंदर्यवती पुढे बॉलिवूडमध्ये झळकल्या.
मानुषीने भविष्यात बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.
मानुषीने मिस वर्ल्डचा किताब पटकावला असला तरीही ती वैद्यशास्त्राची विद्यार्थिनी आहे. सॅनिटरी पॅड्स आणि मासिकपाळीच्या काळातील स्वच्छता याबाबत समाजात सजगता निर्माण करण्यासाठी ती काम करत आहे.
मानुषीला तिच्या कुटुंबाकडून मॉडेलिंग क्षेत्रात काम करण्याला पाठिंबा आहे.