PHOTOS

फक्त डायपरवर असलेलं 2 वर्षांचं बाळ रात्रीच्या मिट्ट काळोखात झाडाझुडपात हरवलं, पोलिसांनी 'असा' घेतला शोध!

लहान मुलं कधी काय करतील याचा काय नेम नसतो. त्यामुळे घरात लहान बाळ असेल तर 24 तास त्याच्यावर नजर ठेवून राहणं गरजेचं असतं. 

Advertisement
1/11
फक्त डायपरवर असलेलं 2 वर्षांचं बाळ रात्रीच्या मिट्ट काळोखात झाडाझुडपात हरवलं, पोलिसांनी 'असा' घेतला शोध!
फक्त डायपरवर असलेलं 2 वर्षांचं बाळ रात्रीच्या मिट्ट काळोखात झाडाझुडपात हरवलं, पोलिसांनी 'असा' घेतला शोध!

Michigan toddler:लहान मुलं कधी काय करतील याचा काय नेम नसतो. त्यामुळे घरात लहान बाळ असेल तर 24 तास त्याच्यावर नजर ठेवून राहणं गरजेचं असतं.

2/11
तंत्रज्ञानामुळे बाळाचा शोध
तंत्रज्ञानामुळे बाळाचा शोध

लहान मुलाकडे थोडं दुर्लक्ष करणं किती महागात पडू शकतं याची प्रचिती अमेरिकीतील एका कुटुंबाला आली. पोलिसांकडे असलेल्या तंत्रज्ञानामुळे त्या बाळाचा शोध घेण्यात आलाय. हा प्रकार पाहून तुम्हीदेखील आवाक् व्हाल.

3/11
बाळाच्या अंगावर फक्त डायपर
 बाळाच्या अंगावर फक्त डायपर

मिशिगनच्या जंगलात एक 2 वर्षांचं बाळ हरवलं. या बाळाच्या अंगावर फक्त डायपर होतं. बाळाच्या आईवडिलांनी तासभर आजुबाजूला त्याचा शोध घेतला. पण बाळ काही सापडलं नाही. 

4/11

बाळ कुठेच सापडत नाही हे लक्षात आल्यावर कुटुंबाने पोलिसांत तक्रार केली. मिशिगन राज्य पोलिसांच्या हेलिकॉप्टरने रविवारी रात्री साडे अकरा वाजता शोध सुरु केला.

5/11
थर्मल कॅमेराचा उपयोग
थर्मल कॅमेराचा उपयोग

त्यावेळी बाळ बेपत्ता होऊन साधारण 3 तास झाले होते. बाळाला शोधण्यासाठी पोलिसांनी थर्मल कॅमेराचा उपयोग केला. 

6/11
मानवी उष्णतेची दिशा
मानवी उष्णतेची दिशा

हा कॅमेरा मानवी उष्णतेची दिशा दाखवतो. काही पोलीस पायी चालत गेले. तर यासोबत पोलिसांनी हेलिकॉप्टरची मदत घेतली.

7/11
मुलगा पोलिसांच्या कॅमेरात
मुलगा पोलिसांच्या कॅमेरात

ब्लॅकमन टाउनशिपमधील 'बिझी इंटरस्टेट 94' पासून काही फूट अंतरावर तो मुलगा पोलिसांच्या कॅमेरात आढळला. तापमान गोठणबिंदूच्यावर असल्याने मुलाचा आकार गर्भाच्या स्थितीप्रमाणे दिसत होता.

8/11
मुलगा आहे की एखादा प्राणी?
 मुलगा आहे की एखादा प्राणी?

पोलिसांना उष्णतेचा सिग्नल मिळत होता. पण तो सिग्नल म्हणजे हरवलेला मुलगा आहे की एखादा प्राणी? हे पोलिसांना कन्फर्म होत नव्हते.

9/11
चानक काहीतरी चमकले
चानक काहीतरी चमकले

हेलिकॉप्टरमधून रात्रीच्यावेळी जमिनीकडे पाहताना अचानक काहीतरी चमकले आणि जमिनीवर असलेल्या अधिकाऱ्या अंधारात त्या आकृतीच्या दिशेने निर्देश करण्यात आला.

10/11
'आम्हाला तो सापडला'
'आम्हाला तो सापडला'

'आम्हाला तो सापडला' असे शोधकर्त्यांपैकी एकाने सांगितले.घडलेल्या या प्रकाराचे इन्फ्रारेड फुटेज समोर आले आहे. 

11/11
मुलाचे सांत्वन
मुलाचे सांत्वन

यानंतर रुग्णवाहिका येण्याची वाट पाहली गेली. अनेक अधिकाऱ्यांनी मुलाला जवळ घेऊन सांत्वन दिले. 





Read More