PHOTOS

'या' चित्रपटाला 2 वर्षे मिळालं नाही थिएटर, रिलीज होताच 75 आठवडे केलं बॉक्स ऑफिसवर राज्य

1983 मधील चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी लागले 2 वर्षे. थिएटरमध्ये प्रदर्शित होताच रचला इतिहास. 75 आठवडे केलं बॉक्स ऑफिसवर राज्य. 

Advertisement
1/7

40 वर्षांपूर्वी थिएटरमध्ये एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण या चित्रपटाला प्रदर्शित होण्यासाठी खूप अडचणींचा सामना करावा लागला. 

2/7

तब्बल 2 वर्षांनंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा करत इतिहास रचला. 

3/7

आम्ही ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत त्याचे नाव 'प्यार झुकता नहीं' आहे. 'प्यार झुकता नहीं' हा चित्रपट 1985 मध्ये प्रदर्शित झाला होता. 

4/7

या चित्रपटात मिथुन चक्रवर्ती यांनी मुख्य भूमिका साकारली होती आणि त्यांची नायिका पद्मिनी कोल्हापुरे होती. या शिवाय चित्रपटात डॅनी, बिंदू देसाई, मास्टर विक्की, मधु मालिनी, विकास आनंद आणि इतर अनेक कलाकार या चित्रपटात होते. 

5/7

मिथुन चक्रवर्ती आणि पद्मीम कोल्हापुरे यांचा हा पहिलाच चित्रपट होता. चित्रपटात मिथुन चक्रवर्तीने एक रोमँटिक भूमिका साकारली होती. 

6/7

त्या काळात तो अॅक्शन आणि डान्स चित्रपटांसाठी प्रसिद्ध होता. हेच कारण होते की चित्रपट तयार होता, पण वितरक तो खरेदी करण्यास तयार नव्हते. 

 

7/7

मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांचा 'प्यार झुकता नही' हा चित्रपट पाकिस्तानी चित्रपट 'आईना'चा रिमेक आहे. हा चित्रपट 75 आठवडे बॉक्स ऑफिसवर सुरु होता. 





Read More