PHOTOS

Modi Cabinet 3.0: मोदींच्या मंत्रिमंडळात घराणेशाही! 18 मंत्री राजकीय वारस; ही घ्या संपूर्ण यादी! काही नावं आश्चर्यचकित करणारी

Modi Cabinet Minister List: नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घराणेशाहीच्या मुद्द्यावरुन अनेकदा काँग्रेसवर टीका केली आहे. मात्र आता मोदी तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर त्यांच्या मंत्रिमंडळातील 18 नेते हे राजकीय घराण्यातील असल्याची यादीच राहुल गांधींनी पोस्ट केली आहे. या यादीतील अनेक नावं आश्चर्यचकित करणारी आहेत. पाहूयात ही संपूर्ण यादी...

Advertisement
1/22
राहुल गांधीं
राहुल गांधीं

काँग्रेस नेते तसेच खासदार राहुल गांधींनी घराणेशाहीवरून केंद्रामध्ये सत्तेत आलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

 

2/22
घराणेशाहीची पार्श्वभूमी
घराणेशाहीची पार्श्वभूमी

नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्यासोबत शपथ घेणाऱ्या मंत्र्यांपैकी केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी असल्याचं राहुल गांधींनी अधोरेखित केलं आहे.

3/22
या यादीत कोणाकोणाचा समावेश
या यादीत कोणाकोणाचा समावेश

मोदींचं मंत्रिमंडळ म्हणजे ‘परिवार मंडळ’ आहे असा टोला त्यांनी लगावला आहे. त्यांनी दिलेल्या या यादीत कोणाकोणाचा समावेश आहे पाहूयात...

4/22
किरेन रिजीजू
किरेन रिजीजू

किरेन रिजीजू : मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये संसदीय कामकाज मंत्री, अल्पसंख्याक व्यवहार मंत्री पदाची जबाबदारी असलेले किरेन रिजीजू हे अरुणाचलचे नेते रिंचेन रिजीजू यांचे पुत्र आहेत.

 

5/22
ज्योतिरादित्य शिंदे
ज्योतिरादित्य शिंदे

ज्योतिरादित्य शिंदे : माजी केंद्रीय मंत्री माधवराव शिंदे यांचे पुत्र असलेले ज्योतिरादित्य शिंदे हे मोदी 3.0 सरकारमध्ये दळणवळण मंत्री, ईशान्य क्षेत्राचे विकास मंत्री झाले आहेत.

 

6/22
ज्योतिरादित्य शिंदे
ज्योतिरादित्य शिंदे

c : कौशल्य विकास आणि उद्यम मंत्रालयाचे नवे राज्यमंत्री असलेले जयंत हे माजी पंतप्रधान चौधरी चरणसिंह यांचे नातू आहेत.

 

7/22
एच.डी. कुमारस्वामी
एच.डी. कुमारस्वामी

एच.डी. कुमारस्वामी : देशाचे नवे अवजड उद्योग मंत्री आणि पोलाद मंत्री असलेले एच.डी. कुमारस्वामी हे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडांचे पुत्र आहेत.

 

8/22
पीयूष गोयल
पीयूष गोयल

पीयूष गोयल : देशाचे नवे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल हे माजी केंद्रीय मंत्री वेदप्रकाश गोयल यांचे पुत्र आहेत.

 

9/22
जे.पी. नड्डा
जे.पी. नड्डा

जे.पी. नड्डा : मोदींच्या मंत्रीमंडळामध्ये नड्डांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री; रसायने आणि खते मंत्री करण्यात आलं आहे. नड्डा हे स्वत: मध्य प्रदेशात मंत्री जयश्री बॅनर्जी यांचे जावई आहेत. 

10/22
धर्मेंद्र प्रधान
धर्मेंद्र प्रधान

धर्मेंद्र प्रधान : देशाचे नवे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे माजी केंद्रीय मंत्री देवेंद्र प्रधान यांचे पुत्र आहेत.

11/22
चिराग पासवान
चिराग पासवान

चिराग पासवान : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री असलेले चिराग पासवान हे माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे पुत्र आहेत. 

12/22
जितीन प्रसाद
जितीन प्रसाद

जितीन प्रसाद : जितीन प्रसाद यांना वाणिज्य और उद्योग मंत्रालयाचं राज्यमंत्री पद देण्यात आलं आहे. ते माजी खासदार जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र आहेत.

 

13/22
रक्षा खडसे
रक्षा खडसे

रक्षा खडसे : केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रक्षा खडसे या माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या स्नुषा आहेत.

14/22
रामनाथ ठाकूर
रामनाथ ठाकूर

रामनाथ ठाकूर : बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पुरी ठाकूर यांचे पुत्र असलेले रामनाथ ठाकूर हे मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये शेती तसेच शेतकरी कल्याण राज्यमंत्री (स्वतंत्र कारभार) आहेत.

 

15/22
राम मोहन नायडू
राम मोहन नायडू

राम मोहन नायडू : नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले राम मोहन रायडू हे माजी केंद्रीय मंत्री येरेन नायडू यांचे पुत्र आहेत.

 

16/22
शांतनु ठाकूर
शांतनु ठाकूर

शांतनु ठाकूर : पोर्ट शिपिंग राज्यमंत्री पदाची जबाबदारी शांतनु ठाकूर यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. पश्चिम बंगालमधील माजी मंत्री मंजुल ठाकूर यांचे ते पुत्र आहेत.

 

17/22
अनुप्रिया पटेल
अनुप्रिया पटेल

अनुप्रिया पटेल : केंद्रीय आरोग्य तसेच कुटुंब कल्याण मंत्री म्हणून अनुप्रिया पटेल यांची वर्णी लागली असून त्या अपना दल संस्थापक सोनेलाल पटेल यांच्या कन्या आहेत.

 

18/22
कीर्ती वर्धन सिंह
कीर्ती वर्धन सिंह

कीर्ती वर्धन सिंह : देशाच्या मंत्रिमंडळात पर्यावरण, वन आणि जलवायु परिवर्तन राज्यमंत्री म्हणून कीर्ती वर्धन सिंह यांची वर्णी लागली आहे. ते उत्तर प्रदेशचे नेते महाराज आनंद सिंह यांचे पुत्र आहेत.

 

19/22
अन्नपूर्णा देवी
अन्नपूर्णा देवी

अन्नपूर्णा देवी : महिला आणि बाल विकास मंत्री असलेल्या अन्नपूर्णा देवी माजी आमदार रमेश प्रसाद यादव यांच्या पत्नी आहेत.

 

20/22
राव इंद्रजित सिंह
राव इंद्रजित सिंह

राव इंद्रजित सिंह : केंद्रीय राज्य मंत्री (स्वतंत्र कारभार) म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात असलेले राव इंद्रजित सिंह हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री वीरेंद्र सिंह यांचे पुत्र आहेत.

 

21/22
रवनीत सिंग बिट्टू
रवनीत सिंग बिट्टू

रवनीत सिंग बिट्टू : मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतलेले रवनीत सिंग बिट्टू हे पंजाबचे दिवंगत मुख्यमंत्री बेयंत सिंग यांचे नातू आहेत. 

 

22/22
18 मंत्र्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी
 18 मंत्र्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी

राहुल गांधींनी मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये 18 मंत्र्यांना घराणेशाहीची पार्श्वभूमी असल्याची यादी पोस्ट करत, "प्रत्यक्ष बोलणे आणि कृती यामध्ये जो फरक आहे त्यालाच नरेंद्र मोदी म्हणतात," अशी कॅप्शन दिली आहे.

 





Read More