PHOTOS

'या' 5 दिग्गजांनी World Cup ही जिंकला पण अर्जून पुरस्कार हुकला! शेवटचं नाव थक्क करणारं

5 Indian Cricket Legends Who Never Won The Arjuna Award: आतापर्यंत भारतामधील 58 क्रिकेटपटूंना अर्जून पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. हा देशातील दुसरा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे. नुकतेच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. मात्र असे काही नामांकित खेळाडू आहेत ज्यांना उत्तम कामगिरीनंतरही हा पुरस्कार मिळालेला नाही. हे खेळाडू कोण ते पाहूयात...

Advertisement
1/11

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते अर्जून पुरस्कार प्रदान करण्यात आला.

2/11

मात्र क्रिकेटच्या मैदानामध्ये अनेक विक्रम नावावर नोंदवणाऱ्या बऱ्याच नामवंत क्रिकेटपटूंना अर्जून पुरस्कार मिळालेला नाही.  आज आपण असा नामवंत क्रिकेटपटूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांचा अर्जून पुरस्कारांसाठी विचार करण्यात आलेला नाही.

3/11

कृष्णमचारी श्रीकांत हे 1990 मध्ये सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जायचे. त्यांनी 43 कसोटी सामने, 146 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

4/11

8439 धावा आणि 25 विकेट्स घेणाऱ्या श्रीकांत यांनाही अर्जून पुरस्कार मिळालेला नाही.

5/11

2003 च्या वर्ल्डकपमध्ये 23 धावांच्या मोबदल्यात 6 विकेट्स घेणाऱ्या आशिष नेहरालाही अर्जून पुरस्कार देण्यात आलेला नाही.

 

6/11

17 कसोटी, 120 एकदिवसीय सामने आणि 27 टी-20 सामने खेळल्यानंतरही नेहराला अर्जून पुरस्कार दिलेला नाही.

7/11

जसप्रीत बुमराह - 183 सामन्यांमध्ये 363 विकेट्स घेणारा भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही अर्जून पुरस्कार मिळालेला नाही.

 

8/11

एकदिवसीय क्रिकेट, कसोटी आणि टी-20 अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला खेळाडू सुरेश रैना आहे.

9/11

मात्र सुरेश रैनालाही अर्जून पुरस्कार देण्यात आलेला नाही. 322 सामन्यांमध्ये सुरेश रैनाने 7,988 धावा केल्या आहेत.

 

10/11

महेंद्र सिंग धोनी- धोनीला अर्जून पुरस्कार मिळालेला नाही. आयसीसीच्या जवळपास सर्वच ट्रॉफी जिंकणाऱ्या धोनीला हा पुरस्कार न मिळण्यामागे खास कारण आहे.

11/11

धोनीला सर्वात मोठ्या क्रीडा पुरस्कारने म्हणजेच खेळरत्न पुरस्कारने त्याला सन्मानित करण्यात आल्याने त्याला अर्जून पुरस्कार देण्यात आला नाही.

 





Read More