महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले आहे. पावसाच्या सरी बरसायला सुरूवात झाल्या की पर्यटकांना वेध लागतात ते पावसाळी सहलींचे. महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर ट्रेक करण्यासाठी देशभरातून ट्रेकर्स येतात.
महाराष्ट्रातील सह्याद्रीचे सौंदर्य पावसाळ्यात आणखी बहरते. असाच एक सुंदर ठिकाण नागरिकांना आकर्षित करते ते म्हणजे अंधारबन. येथील जंगल ट्रेक खूप प्रसिद्ध आहे.
मुळशी तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अंधारबन परिसर हा जंगल ट्रेकसाठी खूप प्रसिद्ध आहे. सुधागड अभयारण्य परिसरात येणाऱ्या अंधारबनची सुरुवात पिंपरी गावातून होते.
पुण्यापासून 57 किमी आणि मुंबईपासून 144 किमी अंतरावर असलेल्या सहृाद्रीच्या डोंगररांगांमध्ये हे अंधारबन हे गाव आहे. हा जंगल ट्रेकच्या मध्यम कठिण प्रकारात मोडले जातो.
कुंडलिका व्हॅली व्ह्यू पॉइंट, सुंदर जंगल, खोल दरी, धबधबे, उन-पावसाचा खेळ, दाट धुके असं सुंदर वातावरण या परिसरात आहे. हा संपूर्ण ट्रेक करण्यासाठी सहा ते सात तास लागतात.
अंधारबनचा पूर्ण प्रवास हा 14 किमीचा असून त्यातील 70 ट्रेक हा सपाटीवर आहे तर, 30 टक्के उतरण आहे.
कुंडलिक व्हॅली, अंधारबन प्रवेशद्वार या दोन ठिकाणी प्रवेशासाठी चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. वनखात्याकडून शुल्क पावती घेऊन कुंडलिक व्हॅली, अंधारबन जंगल ट्रेक करता येतो.
ट्रेकचा स्टार्टींग पॉईंट हा पिंपरी गावापासून सुमारे 200 मीटर अंतरावर, पिंपरी धरणाजवळील इंडिपेंडन्स पॉइंट नावाच्या ठिकाणी आहे. येथे पायवाटेतून जावे. ट्रेकर्सला 50 रुपये शुल्क भरावा लागतो
हा ट्रेक करताना तुम्हाला अनुभवी ट्रेकर्सची मदत घ्या. तसंच, सूचनांचे पालन का. कारण मुसळधार पाऊस आणि धुके यामुळं वाट चुकण्याची शक्यता आहे.