PHOTOS

May Monthly Horoscope : मे महिना कोणासाठी अडचणीचा तर कोणासाठी भाग्यशाली? जाणून मासिक राशीभविष्य

Monthly Horoscope in Marathi : बघता बघता नवीन वर्षातील चार महिने संपले असून मे महिन्याला सुरुवात झाली आहे. अक्षय्य तृतीयाचा हा महिना मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल जाणून घ्या मासिक राशीभविष्य आनंदी वास्तू आणि ज्योतिषशास्त्र पंडीत आनंद पिंपळकर यांच्याकडून 

Advertisement
1/12
मेष (Aries Zodiac)
मेष (Aries Zodiac)

या लोकांसाठी मे महिना खूप आनंद, समृद्धी आणि काही आव्हानांचा असणार आहे. तुमच्या बुद्धीने तुम्ही आव्हांनावर मात करणार आहात. करिअर आणि व्यवसायिकांसाठी हा महिना उत्तम असणार आहे. तुम्हाला मेहनतीचं फळ मिळणार आहे. कार्यक्षेत्राबाबात आनंदाची बातमी मिळणार आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा जरा खर्चिक ठरणार आहे. शिवाय जमीन, वास्तू, वाहन यासारख्या गोष्टींवर तुम्ही खर्च करणार आहात.  महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अचानक कुठूनतरी अडकलेले पैसे मिळणार आहे. मे महिन्यात मेष राशीच्या लोकांनी त्यांच्या बोलण्यावर आणि वागण्यात नम्रपणा ठेवल्यास फायदा होईल. प्रेमसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना अनुकूल राहणार आहे. कडू आणि गोड वादांमधून जोडीदाराशी नातं अधिक मजबूत होणार आहे. या महिन्यात खाण्यापिण्याच्या सवयींबद्दल काळजी घ्या. 

 

2/12
वृषभ (Taurus Zodiac)
वृषभ (Taurus Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी मे महिना संमिश्र असणार आहे. या महिन्यात तुम्हाला अपेक्षित यश मिळविण्यासाठी वेळ लागणार असून तुम्हाला अधिक मेहनत करावी लागणार आहे. या दोन्ही गोष्टींचं समन्वय करण्यात यशस्वी झाल्यास करिअर आणि व्यवसायात फायदा होणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला शुभ परिणाम मिळणार आहे. आर्थिक लाभ मिळविण्यासाठी शॉर्टकट किंवा युक्त्या यांच्या अवलंब करणे तुम्हाला हानिकारक ठरेल. नोकरदार लोकांना महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या कामाच्या ठिकाणी अचानक मोठ्या बदलांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात पैशाचे व्यवहार करताना सावधगिरी बाळगणे गरजेचं आहे. कोणालाही पैसे उधार देऊ नका. लव्ह लाईफ सामान्य असल तर वैवाहिक जीवन आनंदी असेल. शिळं अन्न खाणे टाळा. 

3/12
मिथुन (Gemini Zodiac)
मिथुन (Gemini Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी मे महिना सर्व प्रकारचे यश घेऊन येणार आहे. या महिन्यात तुम्हाला जीवनात प्रगती करण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. तुम्हाला घरातील आणि बाहेरील लोकांकडून सहकार्य आणि पाठिंबा लाभणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. तुमच्या विभागात पदोन्नती आणि बदलची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होणार आहे. मे अखेरीस तुम्हाला अपेक्षित यश मिळणा आहे. परदेशाचे योग आहेत. मे महिन्यात घरगुती खर्चात वाढ होणार आहे. लव्ह लाइफमध्ये आंबट गोड अनुभव येणार आहे. तर वैवाहिक जीवनात आनंद असेल. तर जुनाट आजार उद्भवल्यामुळे शारीरिक वेदनेचा त्रास होण्याची शक्यता आहे.

 

4/12
कर्क (Cancer Zodiac)
कर्क (Cancer Zodiac)

या लोकासाठी मे महिन्याची सुरुवात शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. पण काही वेळानंतर तुम्हाला आव्हांनाचा सामना करावा लागणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला नोकरदार लोकांना नवीन संस्थांकडून चांगल्या नोकरीची ऑफर मिळणार आहे. तुम्हाला वेगवेगळ्या स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होणार आहे. सुख-सुविधांमध्ये वाढ होणार आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरला नवी दिशा मिळणार आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यात येणारे अडथळे दूर होणार आहेत. न्यायालयीन प्रकरणातील निर्णय तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. महिन्याच्या मध्यात तुम्ही उत्पन्नाचे स्त्रोत वाढणार आहे. धोकादायक गुंतवणूक टाळा. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना तुमच्यासाठी सामान्य असणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

5/12
सिंह (Leo Zodiac)
सिंह (Leo Zodiac)

मे महिना सिंह राशीच्या लोकांसाठी भाग्यशाली ठरणार आहे. चांगल्या कर्माची फळ तुम्हाला या महिन्यात मिळणार आहे. कामातील तुमचं समर्पण तुम्हाला यशाची पायरीवर घेऊन जाणार आहे. नोकरदार लोकांच्या कामात बदल होणार आहेत. व्यवसायिकांना मोठे प्रयोग करणे टाळावे लागणार आहे. हितचिंतकांचा सल्ला घेऊन या महिन्यात काम करा. अहंकाराला झटकून तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात नम्रता ठेवा. महिन्याच्या मध्यात नोकरीच्या ठिकाणी तुमच्या विशेष कामासाठी तुमचा सन्मान होणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात काही योजनेत अडकलेले पैसेही तुम्हाला अचानक मिळणार आहेत. हा महिना तुमच्या आरोग्यासाठी प्रतिकूल असणार आहे. नातेसंबंधांच्या दृष्टीकोनातून सिंह राशीच्या लोकांसाठी हा महिना चांगला असणार आहे. 

6/12
कन्या (Virgo Zodiac)
कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीच्या लोकांनी मे महिन्यात कोणतेही पाऊल टाकण्यापूर्वी दहा वेळा विचार करणे फायदे ठरणार आहे. आवेगाने किंवा घाईघाईने घेतलेला निर्णय तुमचं नुकसान करण्याची भीती आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही घरगुती समस्या सोडवण्यात तुम्ही व्यस्त असणार आहात. शिवाय प्रवासाला जाण्याचे योग आहेत. सुरुवातीला तुमचं मन धर्म आणि अध्यात्मावर अधिक केंद्रित असणार आहे. या काळात तुम्ही अचानक एखाद्या तीर्थयात्रेला भेट देणार आहात. व्यवसायाशी संबंधित लोकांना नफा मिळमार आहे. बाजारात तुमची प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्हाला महिन्याच्या मध्यात अचानक रणनीती आखावी लागणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ व्यतित करणार आहात. कुटुंबातील मोठी जबाबदारी पार पाडणार आहात. जमीन, वास्तू, वाहनातून आनंद मिळणार आहे. पचनसंस्थेशी संबंधित किरकोळ समस्यांकडे दुर्लक्ष करु नका. 

7/12
तूळ (Libra Zodiac)
तूळ (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी मे महिना संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला करिअर, व्यवसाय इत्यादींबाबत आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. या काळात तुमचं गुप्त शत्रू कामाच्या ठिकाणी सक्रिय असणार आहेत. तूळ राशीच्या लोकांना मे महिन्याच्या पूर्वार्धात त्यांच्या शुभचिंतकांकडून कमी पाठिंबा मिळणार आहे. महिन्याच्या मध्यापर्यंत परिस्थिती पुन्हा एकदा परिस्थिती बदलेल आणि गोष्टी तुमच्या बाजूने होणार आहेत. या काळात तुमच्या धैर्याच्या आणि मेहनतीच्या जोरावर तुम्ही आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम देणार आहात.  महिन्याच्या मध्यात तुम्हाला करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात तुमच्या जन्मस्थानापासून दूर जावं लागणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार आहे. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून हा महिना सामान्य असणार आहे. प्रेमप्रकरणात सावधगिरीने पुढे जाणे हिताचं ठरेल. आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. 

8/12
वृश्चिक (Scorpio Zodiac)
वृश्चिक (Scorpio Zodiac)

या राशीच्या लोकांना मे महिन्यात मोठ्या बदलांसाठी तयार राहावे लागणार आहेत. या महिन्यात तुम्हाला नवीन धोरणे आणि जीवनात बदल स्वीकारून पुढे जावं लागणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी सकारात्मक आणि शुभ ठरणार आहे. या काळात तुमचा संबंध एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी येणार आहे. नवीन व्यवसायातही हात आजमावू शकणार आहात. एकूणच मे महिन्याची सुरुवात व्यवसायाच्या दृष्टिकोनातून फलदायी असणार आहे. जर तुमचा जमीन किंवा इमारतीशी संबंधित काही वाद होण्याची शक्यता आहे. जमीन आणि इमारतींच्या खरेदी-विक्रीतून तुम्हाला विशेष लाभ मिळणार आहेत. या महिन्यात तुमच्या विरोधकांवर मात करणार आहेत. समाजसेवेशी आणि राजकारणाशी संबंधित लोकांसाठी महिन्याचा उत्तरार्ध सोनेरी ठरणार आहे. तुमच्या आर्थिक फायद्यासाठी शॉर्टकटचा अवलंब करु नका. जास्त बोलण्यापेक्षा लोकांचे ऐकण्यावर विश्वास ठेवल्यास फायदा होईल. काही विषयांवर पालकांमध्ये नाराजी असणार आहे. लव्ह लाईफ आणि वैवाहिक जीवन चांगले ठेवण्यासाठी जोडीदाराचा आदर करा. आरोग्यात थोडे फार त्रास होणार आहे.

 

9/12
धनु (Sagittarius Zodiac)
धनु (Sagittarius Zodiac)

या राशीच्या लोकांना मे महिन्यात सर्व प्रकारच्या समस्या आणि कर्ज इत्यादीपासून मुक्तता मिळणार आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. संधीचं सोनं करण्यासाठी आळस झटकून काम करावं लागणार आहे. नोकरदार आणि व्यवसायिकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. मात्र व्यवसायात काही चढ उतार पहावे लागणार आहेत. व्यवसायात सरासरी नफा मिळणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुम्हाला अपेक्षित नफा मिळणार आहे. सरकारशी संबंधित प्रभावशाली लोकांच्या मदतीने दीर्घकाळ प्रलंबित कामं मार्गी लागणार आहे. नातेसंबंधांच्या दृष्टिकोनातून, महिन्याचा उत्तरार्ध अधिक अनुकूल असणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या कुटुंबाशी संबंधित कोणत्याही मोठ्या समस्येवर तोडगा काढण्यात यशस्वी होणार आहात. प्रेमसंबंध घट्ट होईल तर प्रेम जोडीदाराशी जवळीक वाढणार आहे. वैवाहिक जीवन आनंदी असणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तुमच्या जोडीदाराच्या तब्येतीची चिंता तुम्हाला उदास करणार आहे. 

10/12
मकर (Capricorn Zodiac)
मकर (Capricorn Zodiac)

मे महिना या राशीसाठी स्वप्नपूर्तीचा ठरणार आहे. या महिन्यात जर तुम्ही तुमचं काम योग्य वेळी योग्य पद्धतीने केल्यास तुमची प्रगती होणार आहे. मे महिना करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला नोकरीशी संबंधित काही चांगली बातमी मिळणार आहे. तुम्हाला अपेक्षित लाभ मिळणार आहे. तुम्ही पैसे कमवण्यात तसंच बचत करण्यात यशस्वी होणार आहात. या महिन्यात कोणतेही काम लहान-मोठे न मानता पूर्ण समर्पणाने करावे लागणार आहे. या महिन्यात जमीन, इमारती, वाहने इत्यादींवर मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होणार आहे. तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळणार आहे. उच्च शिक्षणासाठी सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात वाद टाळण्यासाठी लोकांच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच हिताच ठरणार आहे. तुमच्या प्रिय जोडीदाराशी परस्पर समज आणि विश्वास वाढणार आहे. वैवाहिक जीवनात मतभेद होण्याची शक्यता आहे. आरोग्यासाठी व्यायामवर भर द्या. 

11/12
कुंभ (Aquarius Zodiac)
कुंभ (Aquarius Zodiac)

कुंभ राशीसाठी मे महिना संमिश्र असणार आहे. करिअर-व्यवसायाच्या दृष्टिकोनातून, मे महिन्याचा पूर्वार्ध तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात, तुम्हाला तुमची उदरनिर्वाहासाठी अधिक मेहनत आणि प्रयत्न करावे लागणार आहे. नोकरदार लोकांवर अचानक अतिरिक्त कामाचा बोजा वाढणार आहे. या काळात कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या कामात निष्काळजीपणा टाळा. व्यवसायाशी संबंधित लोकांना मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित नफा मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावा लागणार आहे. या काळात, बाजारात तुमची प्रतिष्ठा राखण्यासाठी तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांशी कठोर स्पर्धा करावी लागणार आहे. या काळात तुम्ही तुमच्या व्यवसायाशी संबंधित सर्व कागदपत्रे पूर्ण अयशस्वी ठरणार आहात. आर्थिक दृष्टिकोनातून बोलायचे झाल्यास महिन्याचा पूर्वार्ध थोडा खर्चिक होणार आहे. मे महिन्याच्या उत्तरार्धात करिअर आणि व्यवसायासाठी नशिबाची साथ मिळणार आहे. या काळात तुम्हाला आर्थिक लाभाच्या नवीन संधी मिळणार आहे. नोकरदार लोक कामाच्या ठिकाणी आपली योग्यता सिद्ध करण्यात यशस्वी होणार आहे. कुंभ राशीच्या लोकांना नात्यांचे गुंतागुतीचे धागे सोडवण्यासाठी संयम ठेवावा लागणार आहे. तुमच्या प्रिय जोडीदाराशी अनावश्यक बाबींवर वाद होण्याची शक्यता आहे. सुखी वैवाहिक जीवनासाठी, तुमच्या जोडीदाराशी संवाद ठेवा आणि त्याच्या/तिच्या भावनांचा आदर करा अन्यथा गोष्टी हाताबाहेर जाईल. 

12/12
मीन (Pisces Zodiac)
मीन  (Pisces Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी मे महिन्याची सुरुवात शुभ असणार आहे. या काळात तुमची नियोजित कामं वेळेवर आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत तुम्हाला दुसऱ्या शहरात किंवा देशात व्यवसाय करण्याची मोठी संधी मिळणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित वाढ होणार आहे. प्रभावशाली लोकांशी जोडले गेल्याने तुमचं काम जलद होणार आहे. नोकरदार लोकांसाठी महिन्याचा दुसरा आठवडा थोडा आव्हानात्मक ठरणार आहे. या काळात त्यांना कामाच्या ठिकाणी प्रतिस्पर्ध्यांकडून तसंच नातेवाईकांच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. वैयक्तिक आयुष्यात हा काळ थोडा खर्चिक असणार आहे. मुलांशी संबंधित समस्या तुमच्या चिंतेचे प्रमुख कारण असणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोकांनी या काळात जोखमीची गुंतवणूक टाळा. महिन्याचा उत्तरार्ध तुमच्यासाठी पूर्वार्धाच्या तुलनेत अधिक शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. धार्मिक कार्यात आणि तीर्थयात्रेत सहभागी होण्याचा आनंद तुम्हाला मिळणार आहे. संबंध सुधारण्यासाठी मीन राशीच्या लोकांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. या महिन्यात तुमच्या बोलण्यामुळेच गोष्टी चांगल्या होणार आहेत. अशा वेळी गैरसमज दूर करण्यासाठी आणि नातेसंबंध मजबूत करण्यासाठी अनावश्यक राग आणि वाद टाळणे हिताचे ठरले. आरोग्याशी संबंधित समस्या टाळण्यासाठी, कोणत्याही आजार किंवा शारीरिक समस्येकडे दुर्लक्ष करू नका. तर नातेसंबंधासाठी हा महिना संमिश्र असणार आहे. (Disclaimer -  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)  





Read More