PHOTOS

भारतीयांच्या वर्षिक सॅलरीपेक्षाही त्याला महिन्याला घरभाड्यातून मिळतात जास्त पैसे; 'ही' आकडे पाहून विसराल आकडेमोड

Advertisement
1/10

सर्वसामान्य भारतीयाच्या वर्षिक पगारापेक्षाही अधिक रक्कम हा अभिनेता केवळ त्याची घरं भाड्याने देऊन कमवतोय. त्याच्या घरांचं भाडं आहे तरी कुठे? ती घरं आहेत नेमकी कुठे? जाणून घेऊयात रंजक माहिती...

2/10

बॉलीवूड अभिनेता आणि निर्माता जॉन अब्राहमसध्या 'नेटफ्लिक्स'वरील 'द डिप्लोमॅट'मधील भूमिकेसाठी चांगलाच चर्चेत आहे. 

 

3/10

जॉन हा केवळ उत्तम अभिनेता आहे असं नाही तर तो स्मार्ट गुंतवणुकदारही आहे. त्याने अनेक ठिकाणी प्रॉपर्टीमध्ये आपले पैसे गुंतवले असून त्यामधून तो उत्तम रिटर्न्स मिळवतोय.

 

4/10

जॉनने मुंबईतील वांद्रे पश्चिममधील स्वत:च्या मालकीचे तीन आलिशान फ्लॅट भाडेतत्वावर दिले आहेत. या तीन प्लॅट्ससाठी जॉनला मिळणाऱ्या भाड्याची रक्कम ही अनेकांच्या वर्षिक पगारापेक्षाही अधिक आहे.

 

5/10

जॉनच्या मालकीचे हे तिन्ही फ्लॅट्स 'सी ग्लिम्प्स को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी'मध्ये आहेत. ही इमारत मुंबईतील सर्वाधिक भाडं असलेल्या बँडस्टँडजवळच्या उच्चभ्रूंच्या वस्तीमधील आहे.

 

6/10

जॉन आणि त्याच्या भाडेकरुंदरम्यानचा हा भाडेकरार 29 मे 2025 रोजी नोंदणी करण्यात आला आहे. 'स्क्वेअर यार्ड्स'ने भाडे कराराच्या कागदपत्रांच्या आधारे दिलेल्या वृत्तानुसार, 1.12 लाख रुपयांच्या स्टॅम्प ड्युटी आणि एक हजार रुपयांच्या नोंदणी शुल्कासह भाडेपट्टी करार करण्यात आला आहे. भाडेकरूंकडून जॉनने 36 लाख रुपये एवढी मोठी रक्कम सिक्युरिटी डिपॉझीट म्हणून घेतली आहे.

 

7/10

वांद्रे येथील या तीन फ्लॅट्ससाठी जॉनला दर महिन्याला 6 लाख 30 हजार रुपये भाडं मिळणार आहे. ही रक्कम भारतात नव्याने नोकरीला लागणाऱ्या 50 टक्क्यांहून अधिक फ्रेशर्सला मिळणाऱ्या वर्षिक पगारापेक्षा जास्त आहे.

 

8/10

पहिल्या वर्षासाठी जॉन आणि भाडेकरुंनी तीन घरांसाठी 6 लाख 30 रुपये इतकं मासिक भाडं ठरलं आहे. करारानुसार पहिल्या दोन वर्षांनंतर दरवर्षी हे भाडं 8 टक्क्यांनी वाढणार आहे. त्यानंतर उर्वरित दोन वर्षांसाठी वर्षाला 5 टक्क्यानुसार भाडेवाढ होईल.

 

9/10

म्हणजेच जॉनच्या घराच्या या कराराच्या शेवटच्या वर्षापर्यंत महिन्याचं भाडं 8 लाख रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. 

 

10/10

पाच वर्षांच्या भाडेतत्वावर या प्रॉपर्टीमधून जॉनला एकूण भाडे उत्पन्न म्हणून 4 कोटी 30 लाख रुपये मिळतील असा अंदाज आहे.





Read More