PHOTOS

येथे ओशाळला मृत्यू! भूकंपामुळे क्षणात उद्धवस्त झाला मोरोक्को; अंगावर काटा आणणारे Photos

Morocco Earthquake: मोरोक्को येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला, इतके तीव्र धक्के जाणावले.

Advertisement
1/8
येथे ओशाळला मृत्यू! भूकंपामुळे क्षणात उद्धवस्त झाला मोरोक्को; अंगावर काटा आणणारे Photos
येथे ओशाळला मृत्यू! भूकंपामुळे क्षणात उद्धवस्त झाला मोरोक्को; अंगावर काटा आणणारे Photos

Morocco Earthquake:आफ्रिकन देश मोरोक्कोला 6.8 रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के बसले आहेत. यात आतापर्यंत 632 जणांचा मृत्यू आणि अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. 

2/8
भूकंपाने हाहाकार
भूकंपाने हाहाकार

मोरोक्को येथे पहाटे शक्तिशाली भूकंपाने हाहाकार माजवला. भूकंपाचा केंद्रबिंदू मोरोक्कोच्या मारकेश शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर होता. मारकेशपासून ३५० किलोमीटर अंतरावर असलेल्या राजधानी रबातमध्येही त्याचा प्रभाव जाणवला, इतके तीव्र धक्के जाणावले.

3/8
बचावकार्य सुरू
बचावकार्य सुरू

मोरोक्को येथे ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

4/8
भितीचे वातावरण
भितीचे वातावरण

अचानक जाणवू लागलेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यानंतर लोक घाबरले. काय करावे जे कळायच्या आतच भूकंपाचे तीव्र धक्के बसू लागले. 

5/8
घराबाहेर पळ काढला
घराबाहेर पळ काढला

यानंतर मोरोक्कोमधील नागरिकांनी घराबाहेर पळ काढला. भूकंपामुळे ऐतिहासिक वास्तूंचे मोठे नुकसान झाले असून वीजपुरवठाही खंडित झाला आहे. 

6/8
600 हून अधिक लोकांचा मृत्यू
600 हून अधिक लोकांचा मृत्यू

हा भूकंप माराकेशच्या नैऋत्येस रात्री 11:11 वाजता झाला. मोरोक्कोमध्ये भूकंपामुळे आतापर्यंत किमान 600 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 150 हून अधिकजण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

7/8
भूकंपाची तीव्रता
भूकंपाची तीव्रता

रात्री 11:11 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 6.8 इतकी होती असे यूएस जिओलॉजिकल सर्व्हेने सांगिते. मोरोक्कोच्या राष्ट्रीय भूकंप निरीक्षण नेटवर्कने रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7 एवढी मोजली.  तर यूएस एजन्सीने भूकंपाच्या 19 मिनिटांनंतर 4.9 तीव्रतेचा भूकंप नोंदवली.

8/8
काळजाचा ठोका चुकला
काळजाचा ठोका चुकला

मोरोक्कन लोकांनी भूकंपाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये काही इमारती जमिनदोस्त होऊन ढिगारा झाल्याचे दिसते आहे. यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे.(फोटो सौजन्य- रॉयटर्स आणि एएफआय)





Read More