Sports News : भारताचा स्टार क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा गुरुवारी घटस्फोट झाला. 20 मार्च रोजी यांच्या घटस्फोटावर औपचारिकपणे मोहोर लागली. 2020 मध्ये लग्नबंधनात अडकलेल्या या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. चहलने धनश्रीला वेगळं होत असताना 4.75 कोटींची पोटगी दिली. आतापर्यंत क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंचे घटस्फोट झाले आहेत. तेव्हा क्रिकेट जगतातील सर्वात महागड्या घटस्फोट कोणत्या खेळाडूचा झाला याबाबत जाणून घेऊयात.
चहलने आणि धनश्रीला यांच्या घटस्फोटाची बातमी समोर आली त्यादिवसापासून घटस्फोटावेळी देण्यात येणाऱ्या पोटगीबाबत सुद्धा बरीच चर्चा होती. यापूर्वी असं म्हटलं जात होतं की पोटगीची रक्कम 60 कोटी असू शकते, परंतु ही चर्चा चुकीची होती हे गुरुवारी समोर आले. चहलने धनश्रीला वेगळं होत असताना 4.75 कोटींची पोटगी दिली.
आतापर्यंत क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंचे घटस्फोट झाले आहेत. हार्दिक पंड्या, शिखर धवन सारख्या टीम इंडियातील अनेक खेळाडूंचा यात समावेश आहे. मात्र एक असा खेळाडू आहे ज्याने त्याच्या पूर्व पत्नीला घटस्फोटावेळी जवळपास 1450 कोटी रुपये पोटगी म्हणून दिले होते. हा घटस्फोट क्रीडा विश्वातील सर्वात महागडा ठरला होता.
बास्केटबॉलपटू माइकल जॉर्डन आणि जुआनिता वॅनॉय यांच्यात हा घटस्फोट झाला. अमेरिकेचा खेळाडू माइकल जॉर्डन आणि त्याची पूर्व पत्नी जुआनिता वॅनॉय यांचं लग्न 17 वर्ष चाललं. 2006 मध्ये माइकल जॉर्डन आणि त्याची पूर्व पत्नी जुआनिता वॅनॉय हे विभक्त झाले.
माइकल जॉर्डन याने अमेरिकेला दोन ऑलिम्पिक गोल्ड मेडल मिळवून दिले असून त्याची गणना जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये होते. फोर्ब्सनुसार माइकल जॉर्डनची नेटवर्थ ही 30 हजार कोटी असल्याचे समोर आले होते.
बास्केटबॉलपटू माइकल जॉर्डनच नाही तर अमेरिकन टेनिस स्टार आंद्रे अगासी आणि ब्रुक शील्ड्स यांचा घटस्फोट सुद्धा महागडा ठरला होता. स्टार आंद्रे अगासी याची पूर्व पत्नी ब्रुक शील्ड्स हिने 1,124 कोटींची पोटगी घेतली होती. ब्रूक शील्ड्सशी घटस्फोट घेतल्यानंतर आंद्रे अगासीने जर्मन टेनिस स्टार स्टेफी ग्राफशी लग्न केले.
ग्रेग नॉर्मन-लॉरा एंड्रासी आणि टायगर वुड्स-एलिन नॉर्डेग्रेन यांनी घटस्फोट झाल्यावर त्यांच्या पत्नीना जेवढी पोटगी दिली तेवढी रक्कम ही अनेक भारतीय स्टार क्रिकेटर्सची आयुष्यभराची कमाई आहे. ग्रेग नॉर्मनने टायची पत्नी लॉरा एंड्रासी हिला घटस्फोटाच्यावेळी जवळपास 900 कोटी रुपयांची पोटगी दिली.
प्रसिद्ध गोल्फर टाइगर वुड्स याने पत्नी एलिन नॉर्डेग्रेनला घटस्फोट देताना 860 कोटींची पोटगी दिली. टाइगर वुड्स याला विवाह बाह्य संबंधांमुळे पत्नीला इतक्या कोटींची पोटगी द्यावी लागली होती. यानंतर अनेक कंपन्यांनी टाइगर वुड्स सोबतचे करार रद्द केले.