Blood Test For Mens: सीबीसी म्हणजे पूर्ण रक्त तपासणी नव्हे. या चाचणीत सर्व काही समजत नाही. प्रत्येक पुरुषाने वयाच्या 25 ते तिशीत गेल्यानंतर दरवर्षी काही विशेष रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
Blood Test For Mens: अनेक पुरुष आपल्या शरिराबाबत जागरुत नसतात. कधीतरी अचानक आजारी पडल्यावर सर्व मेडीक्लेम संपतो आणि आपण आधी काळजी घ्यायला हवी होती, असे त्यांना वाटते. पण आधीच नियमित रक्त तपासणी केलात तुम्ही अनेक रोगांपासून वाचू शकता.
सीबीसी म्हणजे पूर्ण रक्त तपासणी नव्हे. या चाचणीत सर्व काही समजत नाही. प्रत्येक पुरुषाने वयाच्या पंचविशी ते तिशीत गेल्यानंतर दरवर्षी काही विशेष रक्त तपासणी करणे आवश्यक आहे.
तुम्ही दरवर्षी लिपिड प्रोफाइल चाचणी केली तर हृदयविकाराचा धोका तुमच्या वेळीच लक्षात येईल. मूत्रपिंड आणि यकृत यांसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या कार्यक्षमतेबद्दल इतर चाचण्या आहेत. तुम्ही वयाची 25 वर्षे ओलांडली असेल तर दरवर्षी या 5 रक्त तपासणी करा.
व्हिटॅमिन बी 12 आपल्या नसांच्या कार्यासाठी खूप महत्वाचे आहे. याशिवाय ते पेशींमध्ये डीएनए आणि लाल रक्तपेशी देखील बनवते. जेव्हा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असते तेव्हा मज्जातंतू कमकुवत होतात, ज्यामुळे कोणतेही काम करताना थकवा आणि अशक्तपणा येतो. दुसरीकडे, व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे हाडे कमकुवत होतात, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि संपूर्ण शरीराच्या कार्यावर परिणाम होतो. त्यामुळे वर्षातून एकदा व्हिटॅमिन बी 12 आणि व्हिटॅमिन डीची चाचणी करुन घेणे महत्त्वाचे आहे.
भारतात मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढतंय. भारतात सुमारे 10 कोटी लोकांना मधुमेह आहे. यापैकी बहुतेकांना तर आपल्याला मधुमेह आहे हेदेखील माहित नाहीय. त्यामुळे प्रत्येक माणसाने वयाची पंचविशी ओलांडल्यावर पूर्ण होताच शुगर टेस्ट करून घेतली पाहिजे. यामध्ये फास्टिंग ब्लड शुगर आणि hba1c टेस्ट करणे आवश्यक आहे.
मेटाबॉलिज्म टेस्टमुळे तुमचे शरीर अन्नातून ऊर्जा निर्माण होतेय की नाही हे कळते. म्हणजेच, तुम्ही जे खाताय त्यातून पोषक तत्वे योग्य प्रकारे मिळतात की नाही हे तपासण्यासाठी मेटाबॉलिक पॅनल चाचणी आवश्यक आहे. यातून मूत्रपिंड, यकृत, साखरेची पातळी, इलेक्ट्रोलाइट्स याबद्दलची माहिती मिळते.
तुम्ही दररोज लोकांना चालताना, नाचताना किंवा भाषण करताना खाली पडताना आणि हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडताना पाहिले असेल.25 वर्षे पूर्ण झाल्यावर पुरुषांनी किमान एकदा तरी हृदय तपासणी करणे आवश्यक आहे. यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट केली जाते. यामध्ये एचडीएल, एलडीएल, ट्रायग्लिसराइड्सची चाचणी केली जाते. यावरून तुमच्या रक्तात किती बॅड कोलेस्टेरॉल आहे हे कळते. घाणेरडे कोलेस्टेरॉल रक्त पुढे जाणे रोखते. रक्त हृदयापर्यंत पोहोचू शकत नाही आणि यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
यकृत शरीरात 500 प्रकारची कार्ये करते. अनेक प्रकारचे एन्झाईम काढते. यकृत कार्य चाचणी हे सर्व उघड करते. त्याचप्रमाणे तुमच्या किडनीची क्षमता किती आहे आणि ती कमकुवत झाली आहे का हे जाणून घेण्यासाठी किडनी फंक्शन टेस्ट केली जाते. 25 वरील प्रत्येक व्यक्तीने वर्षातून एकदा ही चाचणी घेणे आवश्यक आहे.