Monsoon Treking Places in Maharashtra: मान्सूनपू्र्व पाऊस बरसतोय आणि मान्सूनचे राज्यात काही दिवसातच आगमन होणार आहे. त्यामुळे अनेकजण आतापासूनच पावसाचा मनसोक्त आनंद घेण्याचे बेत आखत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत खास आणि एकदम भन्नाट लोकेशन्स
हे ठिकाणी मुंबईपासून जवळ असून बदलापूर स्थानकापासून 15 किलोमीटर अंतरावर आहे. पावसाळ्यात हा धबधबा अतिशय लोकप्रिय पिकनिक पॉइंट आहे. या धबधब्याजवळ एक मस्त शंकराचं मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी मुंबई आणि बाहेरूनही लोक पावसाचा आनंद घेण्यासाठी येतात.
हे ठिकाणी नाशिकजवळ आहे. पावसाळ्यात हे ठिकाण अतिशय भन्नाट आहे. त्र्यंबकेश्वरजवळ हरिहर किल्ला आहे. या किल्ल्याच्या पायऱ्या तशा चढण्यासाठी कठीण आहे. पण एकदा तुम्ही हा गड सर केला ना त्यानंतर डोळ्यासमोर निसर्ग तुमचा सर्व थकवा नाहीसा करेल हे नक्की.
पावसाळ्यातील अजून एक भन्नाट ठिकाण म्हणजे सह्याद्री पर्वतरांगेतील हरिश्चंद्रगड हे इगतपुरीजवळ आहे. इथे शिवमंदिर, पुष्पकर्णी हे पर्यटकांचा आकर्षित करतात. पावसाळ्यात गर्द धुक्यांमध्ये हा गड फिरण्याचा आनंद काही औरच असतो.
महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध असं ठिकाण अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळसुबाई. पावसाळ्यात गिर्यारोहकांसह पर्यटकही मोठ्या प्रमाणात जात असतात.
अहमदनगर जिल्हातील अकोले (Akole) तालुक्यातच रतनगड अजून एक पावसाळ्यातील खास ठिकाण आहे. सांधण दरीची मनमोहक दृश्य पर्यटकांना आकर्षित करतात.
पुणे जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे मुळशी धरण, जिथे पावसाळ्यात पर्यटक तुफान गर्दी करतात. खरंतर याठिकाणी पावसाळा असो किंवा हिवाळी हे ठिकाण पर्यटकांचं आवडती जागा आहे.
लोणावळाजवळ कोरीगड किल्ला अतिशय भन्नाट ठिकाण आहे. लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत या किल्ल्यावर जाण्यास मजा येते. पावसाच्या सरी आणि धुक्याची चादर मनमोहक दृश्य आपल्याला प्रसन्न करतं.
भंडारदरा इथे अनेक नयनरम्य स्थळं आहेत. भंडारदरा धरणाचे मूळ नाव विल्सन डॅम असून त्याच्या जलाशयास आर्थर लेक लोकांना आपल्याकडे आकर्षित करतं. ते निसर्गसौंदर्याने नटलेले स्थान असून अनेक धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, शुद्ध आणि थंड हवा हे इथल्या मूळच्या सौंदर्यात अजूनच भर टाकतात.
ट्रेकिंगसाठी लोणावळ्यातील लोहगड किल्ला पावसाळ्यात अतिशय सुंदर ठिकाण आहे. विंचुकडा, उलटा धबधबा, हनुमान दरवाजा, नारायण दरवाजा, गणेश दरवाजा, महादरवाजा ही ठिकाणंदेखील खूप सुंदर आहेत.
पावसाळा आला की पनवेल शहराजवळ असणाऱ्या कलावंतीण दुर्गाकडे पर्यटकांची पाऊल वळतात. चित्तथरारक अनुभव असलेला या ठिकाणी मुंबई पुण्यातील असंख्य पर्यटक पावसाळ्यात इथे नक्की जातात.