Funeral Theme Pregnancy Photoshoot : एका विचित्र प्रेग्नेंसी फोटोशूटमुळे सोशल मीडियावर महिलेला नेटकऱ्यांचा सामना करावा लागतोय.
आपण आई होणार यापेक्षा मोठा आनंद नाही. या क्षणाचे फोटो काढताना सर्वत्र कसं आनंदी आनंद आणि सकारात्मक वातावरण असायला हवं ना.
पण एका महिलेने तिच्या या आनंदाच्या क्षणाचे फोटोशूट स्मशानभूमीत केल्यामुळे ती ट्रोल झाली आहे.
या महिलेचे फोटोशूटची थीम होती अंतिम संस्कारची...त्यामुळे सर्वत्र नकारात्मक वातावरणात तिने फोटो काढले आहेत.
धक्कादायक म्हणजे हे फोटोशूट सोशल मीडियावर शेअर करताना तिने लिहिलं आहे की, 'बच्चे न होने के लिए R.I.P!'
याचा अर्थ तिला आता बाळ होणार आहे, म्हणजे बाळ न होण्याची जी स्थिती किंवा काळ होता तो आता संपला आहे. म्हणून तिने 'बच्चे न होने के लिए R.I.P!' असं लिहिलं आहे.
या फोटोशूटसाठी तिने काळा रंगाचे कपडे घातले असून ती एका फोटोमध्ये रडताना दिसत आहेत.
अमेरिकेत राहणारी ही 23 वर्षीय महिलेचं नाव चेरिडन लॉग्सडॉन असं आहे. तिच्या या फोटोशूटमुळे ती ट्रोल झाली आहे.