Indian Cinema Banned Movies : जाणून आश्चर्य वाटेल, पण बंदी असूनही भारतात प्रचंड पाहिले गेलेयत हे चित्रपट. एका चित्रपटामुळं तर झालेला मोठा वाद... असे एक नव्हे, तर पाच चित्रपट.... पाहाच!
Indian Cinema Banned Movies : भारतात असे कैक चित्रपट साकारण्यात आले, ज्यांच्या प्रदर्शनानंतरही त्यांच्यावर कैक कारणांनी बंदी घालण्यात आली. मात्र हे चित्रपट कालांतरानं युट्यूबवर प्रदर्शित करण्यात आले.
भारतीय सिनेक्षेत्रात काही कलाकारांनी अशा कलाकृती साकारल्या, ज्यंच्यामुळं सिनेजगतात नवनवीन विषय हाताळण्याची एक नवी सीमा आखली गेली. अशाच चित्रपटांवर देशात, बंदी असली तरीही ते युट्यूबवर मात्र पाहका येत आहेत.
1940 च्या दरम्यान विधवा महिलांना नेमकी कशी वागणूक मिळत होती, बालविवाहाची प्रथा त्यावेळी कशी रुढ झाली अशा काही मुद्द्यांवर भाष्य करणारा ‘वॉटर’ हा चित्रपटसुद्धा बंदीच्या कात्रीत अडकला आणि आता तो फक्त युट्यूबवरच पाहता येतो.
दिग्दर्शक राज अमित कुमारच्या ‘अनफ्रीडम’ चित्रपटावर भारत सरकारनं बंदी आणली होती. सेन्सॉर बोर्डानं चित्रपटाच्या कथानकात बदल करण्याची मागणी केली होती. मात्र निर्मात्यांनी ही मागणी नाकारली.
‘लोएव’ हा याच यादीतील आणखी एक चित्रपट. जिथं समलैंगिक संबंधांवर भाष्य करण्यात आलं होतं. हा चित्रपट फक्त युट्यूबवरच पाहता येतो.
समलैंगिक नातेसंबंधांना अतिशय संवेदनशीलपणे हाताळणारा आणखी एक चित्रपट म्हणजे ‘फायर’. पण, मुळ पायाच चित्रपटासाठी वादाचा विषय ठरला आणि तो फक्त प्रेक्षकांना युट्यूबवरच पाहता आला.
‘मिस्टर इंडिया’सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी ओळखल्या गेलेल्या शेखर कपूर यांनी ‘बँडिट क्वीन’ हा चित्रपट साकारला. मात्र प्रदर्शनानंतर काही दिवसांतच त्याच्यावर बंदी आणण्यात आली.
थोडक्यात काहीशा वेगळ्या धाटणीचे आणि संवेदनशील विषयांवरील हे चित्रपट पाहण्यासाठी You Tube वाचून पर्याय नाही हेच खरं.