Actress Gets Mercilessly Trolled: बॉलिवूडबरोबर दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवणाऱ्या सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिच्या नावाचा आवर्जून उल्लेख केला जातो. अनेकदा सोज्वळ भूमिकांमध्ये दिसणाऱ्या या अभिनेत्रीने शेअर केलेल्या बोल्ड फोटोंमुळे सध्या चाहत्यांनी तिच्याविरोधात संताप व्यक्त केलाय. नेमकं घडलंय काय पाहूयात...
सध्याच्या घडीला बॉलिवूडसह दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारी अभिनेत्री म्हणून तिला ओळखलं जातं.
ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलत आहोत ती आहे, मृणाल ठाकूर! (Mrunal Thakur) मृणाल ठाकूरने छोट्या पडद्यावरुन आपल्या करिअरची सुरुवात केली.
मृणाल ठाकूर चित्रपटांच्या निमित्ताने चर्चेत असते. मात्र ती सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच सक्रीय असून आपल्या आयुष्यासंदर्भातील अनेक घडामोडींचे फोटो ती इन्स्टाग्रामवरुन पोस्ट करत असते.
नुकतेच तिने डम्प फोटो अशी कॅप्शनसहीत काही रॅण्डम फोटो आपल्या अकाऊंटवरुन पोस्ट केले असून त्यापैकी एक फोटोमध्ये ती चक्क बिकीकिनीमध्ये दिसत आहे.
मृणाल ठाकूरने आपल्या पिकनिकदरम्यानचे समुद्रकिनाऱ्यावरील फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून मृणालचा हा बोल्ड फोटो पाहून तिचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर मृणालने अनेकदा स्वत:चे बोल्ड आणि बिनधास्त फोटो पोस्ट केले आहेत. दरम्यान या फोटोंवरुन टीका झाली तरी मृणाल त्यावर फार व्यक्त होत नाही.
मृणालने फोटो शेअर केल्यानंतर तिच्या काही चाहत्यांनी त्यावर आक्षेप नोंदवला आहे. अनेकांनी तिला सीतारमन चित्रपटाची आठवण करुन दिली आहे.
सीतारमन चित्रपटामध्ये मृणाल ठाकूर पारंपारिक वेशभूषेत दाखवण्यात आली आहे. त्यामुळेच अनेकांनी आमची सीता अशी नाही असं म्हटलं आहे.
काहींनी आपल्याला अशा कपड्यांमध्ये मृणालला पाहण्याची इच्छा नसल्याचं म्हटलं आहे.
मात्र त्याचवेळी काहींनी अभिनेत्री त्यांच्या भूमिकांप्रमाणे कपडे परिधान करतात हे लक्षात घेतलं पाहिजे अशी बाजू मांडत मृणालची पाठराखण केली आहे.