Mrunal Thakur's Love Life: मृणाल ठाकूर सध्या तिच्या 'डॅकॉइट' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तिने काही लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले होते. तिच्या करिअरमध्ये तिच्या नातेसंबंधांबाबत चर्चा कायम रंगत राहिल्या आहेत. पाहूया, तिचं नाव कोणकोणत्या कलाकारांशी जोडल गेलं.
मृणाल ठाकूरने टीव्ही, बॉलिवूड आणि साऊथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत राहिली आहे. 1 ऑगस्ट रोजी 33 वा वाढदिवस साजरा करणारी मृणाल आपल्या आयुष्याकडे नेहमीच बिंधासपणे पाहते. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या लव्ह लाइफबद्दल झालेल्या चर्चांवर एक नजर टाकूयात.
अभिनेत्रीने लेखक शरद त्रिपाठीसोबत नातं असल्याच्या अफवा होत्या. दोघांनी एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये एकत्र काम केलं होतं. मात्र शो संपल्यानंतर हे नातं तुटल्याचं म्हटलं जातं.
टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता कुशल टंडनसोबत मृणालच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र मृणालने या बाबतीत कधीच काही भाष्य केलं नाही.
अरिजित तनेजा आणि मृणाल ठाकूर यांच्यातील नात्याच्याही चर्चा झाल्या. मात्र या नात्याबद्दल कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.
तेलुगू अभिनेता सुमंतसोबतचा मृणालचा एक फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांच्या डेटिंगच्या बातम्या पसरल्या. मात्र दोघांनीही या नात्याला कधीच दुजोरा दिला नाही.
2023 मध्ये मृणाल आणि रॅपर बादशाह डेट करत असल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र बादशाहने स्वतः या अफवा फेटाळून लावल्या.
बॉलिवूड अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीसोबतही मृणालचं नाव जोडण्यात आलं. दोघांना वांद्रे येथे एकत्र पाहिल्याने कथित चर्चांना उधाण आलं, पण या नात्याबद्दल कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही.