MS Dhoni company: महेंद्रसिंग धोनी, ज्याला "माही" किंवा "कॅप्टन कूल" म्हणूनही ओळखले जाते, हा भारतीय क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू आणि माजी कर्णधार आहे. एमएस धोनीने आपल्या नेतृत्व, शांत स्वभाव आणि अप्रतिम यष्टिरक्षण कौशल्याने जागतिक क्रिकेटमध्ये स्वतःची एक खास ओळख निर्माण केली आहे.एका छोट्या शहरातून आलेल्या या खेळाडूने आपल्या मेहनतीने आणि चिकाटीने भारतीय क्रिकेटला नवी उंची दिली.
भारताचा माजी महान कर्णधार एमएस धोनी देखील काही कंपन्यांचे नेतृत्व करतो. माहीची कंपनी धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड ही यशाच्या शिखरावर आहे आणि या कंपनीला या टप्प्यावर नेण्यात एका महिलेची महत्त्वाची भूमिका आहे.
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी हे फक्त एक नाव नाही तर एक ब्रँड आहे. माही 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आणि आता फक्त आयपीएल खेळतो. पण यामुळे त्याच्या कमाईत कोणताही फरक पडलेला नाही.
एमएस धोनी देखील काही कंपन्यांचे नेतृत्व करतो. माहीची कंपनी धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड यशाच्या शिखरावर आहे आणि या कंपनीला या टप्प्यावर नेण्यात एका महिलेची महत्त्वाची भूमिका आहे.
जर तुम्हाला वाटत असेल की ही महिला त्याची पत्नी साक्षी धोनी आहे. तर तसे नाही. धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या महिलेचे नाव शीला देवी आहे.
शीला देवी ही दुसरी तिसरी कोणी नसून साक्षीची आई म्हणजेच एमएस धोनीची सासू आहे. 2020 पासून ती तिची मुलगी साक्षीसोबत धोनी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडची सीईओ म्हणून काम करत आहे.
800 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरू झालेल्या या कंपनीची जबाबदारी शीला देवी यांच्या खांद्यावर आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली धोनी एंटरटेनमेंट झपाट्याने वाढत आहे.
शीला देवी या एमएस धोनीच्या सासू आहेत आणि म्हणूनच माही त्यांच्यासमोर आदराने झुकतो. निव्वळ संपत्तीनुसार धोनी जगातील टॉप 10 श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, एमएस धोनीचे नेटवर्थ 125 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1040 कोटी रुपये आहे. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर सुमारे 1400 कोटी रुपयांच्या निव्वळ संपत्तीसह या यादीत अव्वल स्थानावर आहे.
महेंद्रसिंग धोनीने "कॅप्टन कूल" या ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. कॅप्टन कूल हे नाव त्याला त्याच्या शांत शैलीसाठी देण्यात आलेले टोपणनाव आहे. या नावासाठी ट्रेड मार्क्स रजिस्ट्री पोर्टलद्वारे 5 जून रोजी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आला होता.एमएस धोनीला अधिकृतपणे या शब्दाचे हक्क हवे आहेत, असे या पोर्टलवरुन दिसते. त्याच्या वकिलानेही या वृत्ताला दुजोरा दिला.