PHOTOS

MS Dhoni च्या मुंबई, पुण्यातील आलिशान घराचे Photos, फ्लॅटची किंमत रांचीच्या फार्म हाऊसपेक्षाही जास्त?

MS Dhoni Mumbai House Inside Photos : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी हा आज त्याचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने तीन आयसीसी ट्रॉफी जिंकल्या असून तो भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनी हा सध्या त्याच्या कुटुंबासोबत रांची येथील त्याच्या फार्महाऊसमध्ये राहतो. परंतु मुंबई, पुण्यात सुद्धा एम एस धोनीची घरं आहेत. तेव्हा आज त्या घरांविषयी जाणून घेऊयात. 

Advertisement
1/8
एम एस धोनीने भारतासाठी 90 टेस्ट, 350 वनडे आणि 98 टी २० सामने जिंकले आहेत. यात त्याने टेस्टमध्ये 4876, वनडेत 10773 आणि टी २० मध्ये 1617 धावा केल्या आहेत. १५ ऑगस्ट २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली होती. मात्र तो अद्याप आयपीएलमध्ये खेळतोय. 
2/8

एम एस धोनी हा त्याच्या कुटुंबासोबत रांची येथील त्याच्या कैलाशपती फार्महाऊसवर राहतो. धोनीचं हे फार्महाऊस खूपच आलिशान असून जवळपास ७ एकरवर पसरलेलं आहे. या फार्महाउसमध्ये स्विमिंग पूल, जिम, गॅरेज आणि इनडोअर स्टेडियम अशा अनेक सोयी आहेत. 

3/8

मीडिया रिपोर्ट्सनुसार एम एस धोनीचं मुंबईतील घर हे अंधेरी पश्चिम भागात असून अतिशय आलिशान इमारतीत आहे.  या घराच्या गॅलरीतून समुद्रचं दृश्य दिसतं. मध्यतंरी एका क्रिएटरने त्याच्या इंस्टाग्रामवर धोनीच्या घराबाहेरचा व्हिडीओ शूट केला होता. 

 

4/8

धोनीच्या रांची येथील 7 एकरवरील फार्म हाऊसची किंमत ही जवळपास 6 कोटी इतकी आहे. मात्र अंधेरी भागातील आलिशान घरांच्या किंमती लक्षात घेतल्यास धोनीच्या अंधेरी येथील फ्लॅटची किंमत ही जवळपास  6 कोटींपेक्षा जास्त असू शकेल. 

 

5/8

मुंबईच नाही तर पुण्यात सुद्धा एम एस धोनीचं घर असल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलं होतं. पिंपरी चिंचवडमधील गहुंजे स्टेडियमच्या आसपासच्या निसर्ग सौंदर्याची धोनीला भुरळ पडली आणि त्याने येथे घर घेतलं. 

 

6/8

एस्टाडो प्रेसिडेन्शियल असं धोनीने घर घेतलेल्या सोसायटीचं नाव आहे. पुण्यात काही कामासाठी जर येणं झालं तर धोनी याच घरी राहतो. येथे सोसायटीत काही जणांनी धोनीला पहाटे 5 वाजता जॉगिंग करतानाही पाहिलं होतं.

7/8

एम एस धोनीचा जन्म 7 जुलै 1981 मध्ये रांची येथे झाला होता. धोनीला पदमभूषण आणि पदमविभूषण हे देशाचे सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 

8/8

एम एस धोनीने नुकताच 'कॅप्टन कूल' हा ट्रेडमार्क रजिस्टर केला आहे. कॅप्टन कूल हे नाव त्याला त्याच्या शांत शैलीसाठी देण्यात आलेले टोपणनाव आहे. या नावासाठी ट्रेड मार्क्स रजिस्ट्री पोर्टलद्वारे 5 जून रोजी ऑनलाइन अर्ज सादर करण्यात आला होता.एमएस धोनीला अधिकृतपणे या शब्दाचे हक्क हवे आहेत, असे या पोर्टलवरुन दिसते. त्याच्या वकिलानेही या वृत्ताला दुजोरा दिला.

 





Read More