भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी त्याला वेळ असेल त्यावेळी आपल्या खास बंगल्यावर राहाणं पसंत करतो. रांचीमध्ये त्याच्या या बंगल्यावर पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासोबत तो आपला वेळ खूप छान घालवतो. त्यांच्या बंगल्याचे खास फोटो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत.
माहीचा बंगला खूपच सुंदर आणि मनाला भुरळ घालणारा आहे. त्याच्या बंगल्याच्या छताचा रंग काळा आहे. तर साधारण 7 एकर जागेवर हा आलिशान बंगला उभारण्यात आला आहे.
माहीला बाईक्सची खूप आवड आहे. त्याची ही आवड प्रत्येक क्रिकेटरला माहिती आहे. त्याच्याकडे बाईक्सचं खास कलेक्शनही आहे. या बाईक्स पार्क करण्यासाठी त्यानं खास जागा देखील या बंगल्यात ठेवली आहे.
माहीच्या आलिशान बंगल्यात गार्डन आहे. इतकच नाही तर जीम आणि स्वीमिंगपूल देखील आहे. याशिवाय इंडोर गेम्स खेळण्यासाठी खास जागा ठेवण्यात आली आहे.
धोनीच्या बंगल्याचं इंटीरियर खूपच मोहक आहे.
ही रूम पाहूनच आपण अंदाज बांधू शकता की किती सुंदर काम या बंगल्यात केलेलं असेल.