Indian Cricket Team : वर्ल्ड कपनंतर हार्दिकचा ( Hardik Pandya) पत्ता कट होणार का? असा सवाल विचारला जात आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या वनडे सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली सामने खेळवले गेले. मात्र, टीम इंडियाला या मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला.
मालिकेत झालेल्या पराभवानंतर हार्दिक पांड्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. तर त्याच्या फलंदाजीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.
आता हार्दिकच्या जागी नव्या ऑलराऊंडरची गरज असल्याची चर्चा क्रिडाविश्वास होत आहे. तर दुसरीक़डे पांड्याची जागा घेणारा खेळाडू धमाका करताना दिसतोय.
हार्दिक पांड्याला संघातून क्वचितच वगळलं जातं. पण लवकरच टीम इंडियामध्ये पांड्यापेक्षाही घातक अष्टपैलू खेळाडूची एन्ट्री होऊ शकते, स्वत: धोनीने या खेळाडूला ट्रेनिंग दिली आहे.
होय, अंडर-19 वर्ल्ड चॅम्पियन राजवर्धन हंगरगेकरबद्दल आपण बोलतोय. फक्त 20 वर्षीय राजवर्धनने आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने खूप प्रभावित केलंय.
राजवर्धन हंगरगेकर हा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. एमर्जिंग आशिया कपमध्ये राजवर्धन हंगरगेकरने पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट घेतले होते. तर लांबच्या लांब सिक्स खेचण्यासाठी त्याची ओळख आहे.