Mugdha Vaishampayan Prathamesh Laghate Wedding Photos: 'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वंश्यपायन आणि प्रथमेश लघाटे यांचे विवाहपूर्वीच्या सोहळ्यातील फोटो समोर आले आहेत. या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे. पाहूयात हे व्हायरल झालेले फोटो...
'सारेगमप लिटिल चॅमप्स' फेम मुग्धा वंश्यपायन (Mugdha Vaishampayan) आणि प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत.
नुकताच मुग्धा आणि प्रथमेशच्या हळदीचा कार्यक्रम पार पडला.
प्रथमेश आणि मुग्धाने आपल्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
मुग्धाने आणि प्रथमेशने आपआपल्या अकाऊंटवरुन हळद लाववेवे स्वत:चे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे.
फोटो शेअर करताना मुग्धाने 'हरिद्रा लापन! घाणा भरणे', अशी कॅप्शन दिली आहे.
तर प्रथमेशने फोटो शेअर करताना "हरिद्रा लापन! मांगलिक स्नान" अशी कॅप्शन दिली आहे.
अगदी थाटात मुग्धा आणि प्रथमेशने पारंपरिक पद्धतीने हळद समारंभ साजरा केला असून कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही. मात्रा आता मुग्धा आणि प्रथमेशने ग्रहमखाचे फोटोही शेअर केलेत.
सर्व देवी-देवतांना लग्नाला आमंत्रित करण्यासाठीचा या धार्मिक सोहळ्याचे फोटो मुग्धा आणि प्रथमेशने शेअर केलेत.
प्रथमेश पारंपारिक पोषाखात दिसत आहे.
मुग्धाही निळ्या रंगाच्या साडीमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
कधी पदर नीट करताना तर कधी हसतानाचे कॅण्डीड फोटो मुग्धाने शेअर केलेत.
एका फोटोत मुग्धाला मुंडावळ्या बांधत असल्याचं दिसत आहे.
प्रथमेशचे आई, वडील आणि भाऊही या फोटोंमध्ये दिसत आहेत.
त्याचप्रमाणे मुग्धाचेही आई, वडील या या फोटोंमध्ये दिसत आहेत.
मुग्धाचे आई-बाबाही या समारंभात धार्मिक विधींमध्ये सहभागी झाल्याचं दिसत आहे.
साध्या पद्धतीने आपल्या लग्नाचे समारंभ करणाऱ्या या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.
या दोघांच्या फोटोंना हजारोंच्या संख्येनं लाईक्स आणि कमेंट्स आल्यात.
पुढील काही दिवसांमध्ये दोघेही लग्नाबंधनात अडकतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.