PHOTOS

Antilia च्या टॉप फ्लोअरलाच का राहतो अंबानी परिवार? सर्वात महागड्या घराच्या आश्चर्यकारक गोष्टी!

अंबानी परिवाराने त्यांच्या निवासस्थानासाठी सर्वात वरचा मजला का निवडला? 

Advertisement
1/8
Antilia च्या टॉप फ्लोअरलाच का राहतो अंबानी परिवार? सर्वात महागड्या घराच्या आश्चर्यकारक गोष्टी!
Antilia च्या टॉप फ्लोअरलाच का राहतो अंबानी परिवार? सर्वात महागड्या घराच्या आश्चर्यकारक गोष्टी!

Antilia Unknown Facts: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचे खास घर असलेल्या अँटिलियाबद्दल तुम्ही ऐकले असेलच. ही 27 मजली इमारत असून यासाठी साधारण 15 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला. तुम्ही यापूर्वी कधीही ऐकल्या नसतील अशा काही आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेऊया. 

2/8
महागड्या घराच्या आश्चर्यकारक गोष्टी
महागड्या घराच्या आश्चर्यकारक गोष्टी

27 मजली घरात अंबानी कुटुंब सर्वात वरच्या मजल्यावर राहतात. अंबानी परिवाराने त्यांच्या निवासस्थानासाठी सर्वात वरचा मजला का निवडला? याबद्दल फार जणांना माहिती नसेल. अॅंटिलियाच्या आश्चर्यकारक गोष्टी जाणून घेऊया. 

3/8
पारंपारिक एअर कंडिशनरचा वापर नाही
पारंपारिक एअर कंडिशनरचा वापर नाही

अँटिलियामध्ये बाहेरील युनिट्स असलेले पारंपारिक एअर कंडिशनर वापरले जात नाहीत. जड बाह्य युनिट्स काचेच्या आणि संगमरवरीपासून बनवलेल्या राजवाड्याचे सौंदर्य खराब करू शकतात. त्याऐवजी, अँटिलियामध्ये केंद्रीकृत शीतकरण प्रणाली वापरली जाते. म्हणून अॅंटिलियामध्ये पारंपारिक एअर कंडिशनरचा वापर करत नाही.

4/8
एअर कंडिशनिंग सिस्टम लोकांसाठी नाहीये
एअर कंडिशनिंग सिस्टम लोकांसाठी नाहीये

अँटिलियामधील वातानुकूलन यंत्रणा लोकांसाठी नाही तर आत ठेवलेल्या फुलांचे आणि कलाकृतींचे जतन करण्यासाठी बसवण्यात आली आहे. जर तुम्ही या इमारतीत गेलात आणि एसी थोडा कमी करायला सांगितलात तर इमारत व्यवस्थापक तुम्हाला त्यासाठी नकार देतील.

5/8
अंबानी कुटुंब 27 व्या मजल्यावर का राहते?
अंबानी कुटुंब 27 व्या मजल्यावर का राहते?

अँटिलियामध्ये हेलिपॅड, स्नो रूम, स्पा, मंदिर, खासगी थिएटर, बॉलरूम, अनेक स्विमिंग पूल आणि अगदी एक आईस्क्रीम पार्लर देखील आहे. पण अंबानी कुटुंबाने त्यांचे निवासस्थान म्हणून 27 वा मजला निवडला आहे. नीता अंबानी यांच्या मते याचे कारण प्रकाश आणि वायुवीजन आहे.

6/8
27 व्या मजल्यावर कोण राहतं?
27 व्या मजल्यावर कोण राहतं?

वरच्या मजल्यावर मुकेश आणि नीता अंबानी त्यांची मुले आकाश, ईशा, अनंत आणि आकाशची पत्नी श्लोका मेहता आणि अनंतची पत्नी राधिका मर्चंट राहतात. हे एक अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे. फक्त कुटुंब आणि काही विश्वासू सहकारी वरच्या मजल्यावर जाऊ शकतात. वरचा मजला जमिनीपासून 568 फूट उंच आहे. येथून मुंबईचे विहंगम दृश्य दिसते.

7/8
अँटिलियामध्येही होते बर्फवृष्टी?
अँटिलियामध्येही होते बर्फवृष्टी?

अँटिलियाच्या सर्वात चर्चेत असलेल्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे स्नो रूम. येथे भिंतींवरून कृत्रिम हिमकण पडतात. मुंबईच्या उष्णतेपासून आराम मिळवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग असल्याचे अंबानी परिवाराला वाटते.

8/8
नावही खास
नावही खास

अंबानी कुटुंबाचे घर असलेल्या या इमारतीचे नाव स्वप्नभूमी मानल्या जाणाऱ्या पौराणिक बेट अँटिलियावरून ठेवण्यात आले आहे.





Read More