Mukesh Ambani Loses Rs 80000 Crore: देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींना मोठा आर्थिक फटका बसला आहे. नेमकं घडलंय काय जाणून घेऊयात सविस्तरपणे...
भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या मुकेश अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 30 सप्टेंबर रोजी सेन्सेक्स 1100 अंकांनी गडगडला.
या पडझडीचा मोठा परिणाम रिलायन्ससारख्या मोठ्या कंपन्यांना बसला आहे. शेअर बाजारातील पडझडीमध्ये रिल्यान्सचं बाजारमूल्य तब्बल 800000000000 रुपयांनी म्हणजेच 8000 कोटी रुपयांनी कमी झालं आहे.
30 सप्टेंबर रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स विक्रमी 3 टक्क्यांनी पडले. बीएसईमध्ये शेअर्स 3.35 टक्क्यांनी गडगडले.
मंगळवारी म्हणजेच 1 ऑक्टोबर रोजीही हा पडझडीचा ट्रेण्ड कायम दिसला. मंगळवारी रिलायन्सचे शेअर्स 0.89 टक्क्यांनी पडून प्रती शेअर 2927 पर्यंत खाली आले.
रिलायन्स इंडस्ट्रीजचं बाजार मूल्य सोमवारी म्हणजेच 30 सप्टेंबरला 67000 कोटींनी पडलं. तर मंगळवारी कंपनीचं मूल्य 12000 कोटींनी घसरलं. म्हणजेच सरासरी रिलायन्सच्या कंपन्यांनी दोन दिवसांमध्ये 80000 कोटी रुपये गमावले.
मागील काही दिवसांपासून रिलायन्सच्या शेअर्समध्ये पडझड होताना दिसत आहे. शेअर्सची किंमत पडत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी पैसा काढून घेण्याचा निर्णय घेतल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजला फटका बसल्याचं सांगितलं जात आहे.
भारतीय शेअर बाजाराने मागील आठवड्यात दमदार कामगिरी केल्यानंतर सोमवारपासून शेअर बाजाराला घरघर लागली आहे. सोमवारी शेअर बाजार 1000 अंकांनी तर निफ्टी 300 अंकांनी घसरला.
निफ्टीमध्ये बँका, वाहन कंपन्या आणि अर्थविषय सेवा देणाऱ्या कंपन्यांबरोबरच बांधकाम व्यवसायातील कंपन्यांनाही मोठा फटका बसल्याचं दिसून आलं आहे.