PHOTOS

Mukesh Ambani यांनी आणला Jio चा सर्वात स्वस्त प्लान, 3 महिने फ्री कॉलिंग आणि डेटा; किंमत फक्त...

जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल.

Advertisement
1/9
Mukesh Ambani यांनी आणला Jio चा सर्वात स्वस्त प्लान, 3 महिने फ्री कॉलिंग आणि डेटा; किंमत फक्त...
Mukesh Ambani यांनी आणला Jio चा सर्वात स्वस्त प्लान, 3 महिने फ्री कॉलिंग आणि डेटा; किंमत फक्त...

Jio Cheapest Plan:जियो रिचार्जच्या प्लानच्या किंमती वाढल्यानंतर यूजर्स बीएसएनएल, एअरटेल अशा ऑपरेटरकडे वळते झाले होते. यानंतर आपल्या यूजर्सना परत आणण्यासाठी आणि आहे त्या यूजर्सना न सोडण्यासाठी मुकेश अंबानींच्या जियोने दमदार प्लान आणलाय.

2/9
सर्वात स्वस्त प्लान
सर्वात स्वस्त प्लान

जियोने 3 महिन्याचा सर्वात स्वस्त प्लान आणलाय. या प्लानमध्ये तुम्हाला 3 महिने रिचार्जची काळजी करण्याची गरज नसेल. अगदी निश्चिंत होऊन तुम्ही कॉल आणि इंटरनेटचा वापर करु शकता. 

3/9
84 दिवसांचा रिचार्ज प्लान
 84 दिवसांचा रिचार्ज प्लान

या 84 दिवसांचा रिचार्ज प्लान जियो पोर्टल किंवा माय जियो अॅपच्या प्रिपेड प्लानमध्ये मिळेल. सध्याच्या लिस्टमध्ये जियोचा हा प्लान सर्वात स्वस्त आहे. या जियो रिचार्जमुळे यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल. 

4/9
अनेकांना माहिती नाही
अनेकांना माहिती नाही

यासोबतच स्थानिक आणि एसटीडी कॉलिंगदेखील मिळेल. हा रिचार्ज प्लान 479 रुपयांचा आहे. पण अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही. कारण हा प्लान पेटीएम आणि फोनपेवर देण्यात आला नाहीय.

5/9
479 रुपयांच्या प्लानचा तपशील
479 रुपयांच्या प्लानचा तपशील

हा 84 दिवसांचा रिचार्ज प्लान घेणाऱ्या यूजर्सला एकूण 6 जीबी इंटरनेट डेटा मिळेल. यासोबत 1000 एसएमएसदेखील मिळतील. यामुळे तुम्हाला कनेक्ट राहणं सोपं होणार आहे.

6/9
जियो टीव्ही, जियो सिनेमा
जियो टीव्ही, जियो सिनेमा

या प्लानसोबत तुम्हाला जियो टीव्ही, जियो सिनेमा आणि जियो क्लाउडची सुविधा मिळेल. असे असले तरी या प्लानमध्ये तुम्हाला जियो सिनेमा प्रिमियम मेंबरशिप मिळणार नाही.

7/9
कॉलिंगसाठी बेस्ट
कॉलिंगसाठी बेस्ट

ज्यांना केवळ कॉलिंगसाठी रिचार्ज करायचा असेल, त्यांच्यासाठी हा प्लान बेस्ट आहे. 

8/9
2 नवे Apps
2 नवे Apps

या व्यतिरिक्त जियो 2 नवे अॅप्स लॉच करत आहे. जियो ट्रान्सलेट आणि जियो सेफ अशी या 2 अॅप्सची नावे आहेत. जियो ग्राहक पूर्ण एक वर्षापर्यंत या सेवांचा मोफत वापर करु शकतात. 

9/9
799 प्लानचा तपशील
799 प्लानचा तपशील

84 दिवसांच्या कॅटगरीमध्ये सर्वात प्रसिद्ध हा 799 रुपयांचा प्लान आहे. आधी याची किंमत 666 रुपयांचा होता. यामध्ये तुम्हाला 84 दिवसांपर्यंत अनलिमटेड कॉलिंग, रोज 1.5 जीबी डेटा, रोज 100 एसएमएस मिळायचे. जियो टीव्ही, जियो सिनेमा आमि जियो क्लाउडची सुविधादेखील मिळते. याशिवाय 666 रुपयांचा प्लानदेखील आहे, ज्यामध्ये 70 दिवसांची वॅलिडीटीी मिळते.





Read More