PHOTOS

एकेकाळी मुकेश अंबानींचा राइट हॅण्ड; 750000000 पगाराची नोकरी सोडून साधू बनण्याचा निर्णय!

मुकेश अंबानींचे विश्वासू सहाय्यकांपैकी एक, रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष असलेले प्रकाश शाह यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून त्यांच्या पत्नीसोबत दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत प्रकाश शाह? जाणून घेऊया.

Advertisement
1/9
एकेकाळी मुकेश अंबानींचा राइट हॅण्ड; 750000000 पगाराची नोकरी सोडून साधू बनण्याचा निर्णय!
एकेकाळी मुकेश अंबानींचा राइट हॅण्ड; 750000000 पगाराची नोकरी सोडून साधू बनण्याचा निर्णय!

Prakash Shah: मुकेश अंबानींचे विश्वासू सहाय्यकांपैकी एक, रिलायन्स इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष असलेले प्रकाश शाह यांनी वर्षानुवर्षे कंपनीच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली. निवृत्तीनंतर त्यांनी सांसारिक जीवनाचा त्याग करून त्यांच्या पत्नीसोबत दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. कोण आहेत प्रकाश शाह? जाणून घेऊया. 

2/9
प्रकाश शाह कोण आहेत?
प्रकाश शाह कोण आहेत?

प्रकाश शाह हे रिलायन्स इंडस्ट्रीजचे माजी उपाध्यक्ष आणि मुकेश अंबानींचे सर्वात विश्वासू अधिकाऱ्यांपैकी एक आहेत. त्यांनी वर्षानुवर्षे मुकेश अंबानींसोबत कंपनीला उंचीवर नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

3/9
आयआयटी मुंबईतून शिक्षण
आयआयटी मुंबईतून शिक्षण

उच्च शिक्षण आणि कारकिर्दीची सुरुवात प्रकाश शाह यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आणि नंतर आयआयटी मुंबईतून पदव्युत्तर शिक्षण घेतले.

4/9
अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका
 अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका

ते रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये प्रोजेक्ट डिव्हिजनच्या उपाध्यक्ष पदावर पोहोचले आणि जामनगर पेटकोक गॅसिफिकेशन प्रोजेक्टसारख्या अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली.

5/9
कुटुंबाचा पाठिंबा आणि दीक्षा घेण्याची आवड
कुटुंबाचा पाठिंबा आणि दीक्षा घेण्याची आवड

प्रकाश शहा यांना दोन मुले आहेत. त्यापैकी एकाने आधीच 'दीक्षा' घेतली होती. दुसरा मुलगा विवाहित आहे आणि त्याला एक नातू देखील आहे. प्रकाश शहा बऱ्याच काळापासून दीक्षा घेण्यास उत्सुक होते पण कोरोनामुळे त्यांना ते पुढे ढकलावे लागले.

6/9
महावीर जयंतीला घेतला संन्यास
महावीर जयंतीला घेतला  संन्यास

प्रकाश शहा यांनी त्यांच्या पत्नी नैना शाह यांच्यासह महावीर जयंतीच्या शुभ प्रसंगी दीक्षा घेतली. दीक्षा हा एक आध्यात्मिक संकल्प आहे ज्यामध्ये व्यक्ती सांसारिक आसक्ती सोडून मोक्षाकडे वाटचाल करते.

7/9
कोटींचा पगार सोडला आणि संताचे जीवन स्वीकारले
कोटींचा पगार सोडला आणि संताचे जीवन स्वीकारले

माध्यमांच्या वृत्तानुसार निवृत्तीनंतर प्रकाश शहा यांनी दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांचे वार्षिक वेतन सुमारे 75 कोटी रुपये होते.

8/9
आता जगतात संन्यासीचे जीवन
आता जगतात संन्यासीचे जीवन

आता प्रकाश शाह अनवाणी चालतात. पांढरे कपडे घालतात आणि भिक्षेवर अवलंबून असतात. त्यांनी भौतिक सुखसोयींचा त्याग करून आध्यात्मिक शांती आणि मोक्षाचा मार्ग निवडला आहे.

9/9
​प्रेरणादायी जीवन परिवर्तन
​प्रेरणादायी जीवन परिवर्तन

जीवनात कितीही उंची गाठली तरी शेवटी आत्म्याची शांती आणि अध्यात्माची प्राप्ती हेच सर्वात मोठे यश आहे, हे प्रकाश शहा यांचा हा निर्णय दाखवतो.





Read More