आज आम्ही तुम्हाला कोणत्या मूलांक असणाऱ्या व्यक्तीला सर्वात जास्त फिरण्याची आणि बोलण्याची आवड असते हे सांगणार आहोत.
...कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव जाणून घेयचा असेल तर तो त्याच्या जन्मतारखेवरून कळू शकतो.
आज आम्ही तुम्हाला मूलांक 5 बद्दल सांगणार आहोत. ज्यामध्ये हे लोक कसे असतात त्यांची पर्सनालिटी कशी असते.
5 मूलांक असणार्या लोकांचा जन्म हा कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला झालेला असतो.
या तारखेला जन्मलेल्या लोकांना नेहमी प्रवास करण्याची आवड असते. ते नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी नेहमी जात असतात.
त्याचबरोबर 5 मूलांक असणाऱ्या लोकांकडे उत्तम संवाद कौशल्य असते. ते त्यांच्या संवाद कौशल्याने इतर लोकांवर प्रभाव पडतात.
तसेच या मूलांकाचे लोक खूपच हुशार असतात. ते नेहमी विचार करून कोणताही निर्णय घेतात.
या लोकांना नेहमी बोलण्याची सवय असते. त्यांना कोणीही भेटलं तरी ते त्यांना बोलतात.
मूलांक 5 असलेले लोकही मोठे व्यापारी बनतात. ते जीवनात खूप प्रगती करतात. त्यांच्याकडे अफाट संपत्ती असते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)